Tarun Bharat

व्हेरेव्हला 40 हजार डॉलर्सचा दंड

ऍकापुल्को (मेक्सिको)/ वृत्तसंस्था

जर्मनीचा तृतीय मानांकीत टेनिसपटू ऍलेक्झांडर व्हेरेव्हने येथे सुरु असलेल्या एटीपी टूरवरील ऍकापुल्को टेनिस स्पर्धेत बेशिस्त वर्तन केल्याने त्याला स्पर्धा आयोजकांनी हकालपट्टी केल्यानंतर आता त्याला 40 हजार डॉलर्सचा दंडही केला आहे.

या स्पर्धेत दुहेरीच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर व्हेरेव्हने पंचांच्या खुर्चीला रॅकेटने मारत त्यांच्याशी असभ्य वर्तन केले होते. स्पर्धा आयोजकांनी व्हेरेव्हला त्याच्या या अखिलाडू व बेशिस्त वर्तनाबद्दल 40 हजार डॉलर्सचा दंड ठोठावला  आहे. या स्पर्धेत जर्मनीचा व्हेरेव्ह आणि ब्राझिलचा मेलो पुरुष दुहेरीत खेळत असताना त्यांना ब्रिटनचा ग्लॉसपूल आणि फिनलँडचा हेलीओव्हेरा यांनी पराभूत केले होते. व्हेरेव्हला आपल्या तापट स्वभावावर नियंत्रण राखता आले नाही. त्याने तीन वेळा पंचांच्या खुर्चीला रॅकेट मारत हुज्जत घातली.

Related Stories

पदक विजेत्या बॅडमिंटनपटूंसाठी बीएआयकडून बक्षिसाची घोषणा

Patil_p

तिसरा वनडे सामना पावसामुळे वाया

Patil_p

होय, मी चीट केले! आनंदला पराभूत करणाऱया अब्जाधीशाची कबुली!

Patil_p

अर्सेनेल पराभूत, लिसेस्टरचा सामना बरोबरीत

Patil_p

डेव्हिस चषक टेनिस सर्बिया उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

दुखापतीमुळे जेमिसन कसोटी मालिकेतून बाहेर

Patil_p