Tarun Bharat

व्हेरेव्ह, बुस्टा, ब्रॅडी, ओसाका उपांत्य फेरीत

अमेरिकन ओपन टेनिस : शॅपोव्हॅलोव्ह, कोरिक, शेल्बी रॉजर्स, पुतिनत्सेव्हा स्पर्धेबाहेर

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेची जेनिफर ब्रॅडी, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, स्पेनचा पाब्लो कॅरेनो बुस्टा यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला तर शेल्बी रॉजर्स, युलिया पुतिनत्सेव्हा, क्रोएशियाचा बोर्ना कोरिक, कॅनडाचा डेनिस शॅपोव्हॅलोव्ह यांचे आव्हान संपुष्टात आले.

चौथ्या मानांकित ओसाकाने बिगरमानांकित रॉजर्सचा 6-3, 6-4 असा पराभव करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. तिची उपांत्य लढत अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीशी होणार आहे. 22 वर्षीय ओसाकाने रॉजर्सवर सव्वातासाच्या खेळात मात केली. यापूर्वी तीनदा ओसाकाला रॉजर्सकडून पराभूत व्हावे लागले होते, त्याची ही परतफेड असल्याचे तिने सांगितले. 28 व्या मानांकित ब्रॅडीने 23 व्या मानांकित पुतिनत्सेव्हाचा 6-3, 6-2 असा फडशा पाडला.

पुरुष एकेरीत पाचव्या मानांकित व्हेरेव्हने खराब सुरुवात केली होती. पण नंतर खेळ उंचावत त्याने 27 व्या मानांकित कोरिकवर सुमारे साडेतीन तासाच्या संघर्षपूर्ण लढतीत 1-6, 7-6 (7-5), 7-6 (7-1), 6-3 अशी मात करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. त्याची उपांत्य लढत पाब्लो कॅरेनो बुस्टाविरुद्ध होणार आहे. 20 व्या मानांकित बुस्टाने 12 व्या मानांकित शॅपोव्हॅलोवर पाच सेट्समध्ये 3-6, 7-6 (7-5), 7-6 (7-4), 0-6, 6-3 अशी मात केली. जवळपास चार तास ही झुंज रंगली होती. 2017 मध्येही बुस्टाने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. ‘मला या लढतीने जवळपास शक्तिहीन केले. मात्र या लढतीने मला समाधानही वाटले,’ असे बुस्टा नंतर म्हणाला.

Related Stories

इटलीच्या सिनरचे आव्हान समाप्त

Amit Kulkarni

किरण नवगिरे यांची इंग्लड दौऱ्यासाठी निवड

datta jadhav

डरेन गॉ पंचगिरी करणार नाहीत

Amit Kulkarni

अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याकरिता दीपा मलिक खेळातून निवृत्त

Patil_p

भारताच्या महिला रिकर्व्ह संघाला कांस्यपदक

Amit Kulkarni

आयसीसी कसोटी मानांकनात कोहली-विल्यम्सन संयुक्त दुसऱया स्थानी

Patil_p
error: Content is protected !!