Tarun Bharat

व्हॉटसअ‍ॅपवर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या दोघा तरुणांवर गुन्हा दाखल

Advertisements

प्रतिनिधी / गडहिंग्लज

व्हॉट्सअ‍ॅपवर जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी फिरोज मुस्ताक नाईकवाडे (रा. भडगाव), मुस्तफा साहेबलाल नाईकवाडे (रा. भडगाव) त्या दोघांच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे. ‘आम्ही भडगावकर’ या व्हॉट्सअप ग्रुपवर या दोघांनी तबलकी जमात निजामुद्दीन मरकजचे प्रमुख मौलाना साद कंदलावी यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आणि मुस्लिम समाजाच्या भावना भडकतील, क्षोभ निर्माण होईल असे लिखाण या ग्रुप ४ एप्रिल रोजी रात्री करण्यात आले आहे. याची फिर्याद भडगावचे पोलीस पाटील उदय भरमा पुजारी यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी भडगावला भेट देऊन त्याची माहिती घेतली आहे.
या दोघांच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास हवालदार संभाजी कोगेकर हे करत आहेत.

Related Stories

पूर्वपरवानगीत अडकली कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा

Archana Banage

पीएम मोदींच्या सूचनांचा सीएम ठाकरेंकडून स्वीकार; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उचलणार कठोर पावले

Archana Banage

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी रोखली ‘घोडावत’ कारखान्याची वाहतूक; ट्रॅक्टरची सोडली हवा

Abhijeet Khandekar

सांगली : फौजदार गल्ली येथे कोरोना योध्याचा सत्कार

Archana Banage

पालिकेच्या आरोग्य विभागाची घडी विस्कटली

Patil_p

कोल्हापूर, सोलापूरची सुवर्णसलामी

datta jadhav
error: Content is protected !!