Tarun Bharat

व्हॉट्सऍप विरोधातील याचिकेवर केंद्राला नोटीस

प्रायव्हसी पॉलिसीवरून फेसबुक-व्हॉट्सऍपला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सोशल मीडियाच्या प्रायव्हसी पॉलिसीवरून (खासगीकत्व धोरण) नाराजी व्यक्त करत फेसबुक आणि व्हॉट्सऍपला फटकारले आहे. प्रायव्हसी पॉलिसीसंदर्भात युरोप आणि भारत या दोन ठिकाणी वेगवेगळय़ा धोरणांचा अवलंब केल्याने सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांना खडे बोल सुनावले. तसेच सदर कंपन्यांनी आपण ग्राहकांचे संदेश वाचत नसल्याचे स्पष्टीकरण लिखित स्वरुपात द्यावे, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारलाही नोटीस जारी करत खुलासा मागितला आहे.

युरोप आणि भारत या दोन ठिकाणी फेसबुक आणि व्हॉट्सऍप या सोशल मीडियाने प्रायव्हसी संबंधित वेगवेगळे धोरण अवलंबले आहे, अशा स्वरुपाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या दोन कंपन्यांना फटकारले आहे. भारतात डेटा प्रोटेक्शनसंबंधी नवीन कायदा तयार करण्यात येत आहे. तो कायदा तयार करण्यापूर्वीच व्हॉट्सऍपने आपली नवी प्रायव्हसी तयार केली असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

कंपन्या ग्राहकांमुळेच मोठय़ा झालेल्या असतात. तुमची संपत्ती आज दोन किंवा तीन ट्रिलीयनपर्यंत असली तरी सर्वसामान्य ग्राहक आपल्या खासगी जीवनाचे मूल्य त्यापेक्षाही जास्त असल्याचे मानतात. तसं मानण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे, असे खडे बोल सुनावत सर्वोच्च न्यायालयाने फेसबुक आणि व्हॉट्सऍप या कंपन्यांना दणका दिला आहे.

व्हॉट्सऍपने 2016 साली आपली प्रायव्हसी पॉलिसी तयार केली होती. त्यावेळीही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना नागरिकांच्या खासगी जीवनाचे संरक्षण करण्यासाठी सरकार काही पावले उचलणार आहे का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केली होती. आताही लोकांच्या सुरक्षिततेबाबत सरकारकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. …………….

Related Stories

निवडणूकीपूर्वी शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता? रामदास आठवले

Archana Banage

नितीश कुमारांवर भाजप नेते सुशील मोदींचा गंभीर आरोप

Patil_p

‘व्होडाफोन समूहा’चा भारताला दणका

Patil_p

बाल लैंगिक शोषणप्रकरणी सीबीआयचे 20 राज्यात छापे

Patil_p

लालू यादवांच्या निकटवर्तीयाला अटक

Patil_p

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यु

Abhijeet Khandekar