नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडीया या तोटय़ात चाललेल्या कंपनीला वाचवण्यासाठी सरकार आता पुढे आले आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत 15 हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळू शकते. सदरच्या बातमीनंतर शेअर बाजारात कंपनीच्या समभागाने 6 टक्के इतकी वाढ दर्शवली होती. यापूर्वी निधी उभारण्यासंदर्भात घोषणा मात्र झाली होती पण किती निधी उभारला जाणार आहे त्याची माहिती देण्यात आली नव्हती. या गुंतवणूकीनंतर कंपनीला आधीची उधारी भरण्यासोबत खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमकरीता पैशाचा वापर करावा लागणार आहे.


previous post
next post