Tarun Bharat

व्होडाफोन-आयडिया कंपनीचा बदलला ब्रँड

आता यापुढे व्हीआय नावाने कार्यरत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वित्तीय संकटाशी सामना करणारी दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया आता नवीन ब्रँडसोबत सादर होणार असून तिचे नाव व्हीआय म्हणून ठेवण्यात आले आहे. कंपनीने आज आपल्या रिब्रँडिंगची घोषणा केली आहे.

सदर कंपनीचा मालकी हक्क ब्रिटनच्या व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूहाजवळ आहे. यामध्ये जिओच्या प्रवेशानंतर दोन्ही कंपन्या एकत्रित आल्या आहेत. तेव्हापासून व्होडाफोन आयडिया या नावाने कंपनी अस्तित्वात आली आहे. कंपनीने आता आपल्या टेरिफमध्येही वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. 

आजच्या स्थितीत व्हीआय या ब्रँडचे सादरीकरण करताना आम्हाला खूप आनंद होत असून या नव्याने सादर होणाऱया बँडला लोकांची मोठी पसंती मिळणार असल्याचा विश्चास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविन्दर टक्कर यांनी व्यक्त केला आहे. दूरसंचार क्षेत्रात सध्याला स्पर्धा असून आम्ही दोन मोठे स्पर्धक असून एका ध्येयाने आम्ही काम करत असल्याचेही यावेळी टक्कर यांनी म्हटले आहे.

कंपनी सुरूवातीला टेरिफ वाढविण्यासाठी तयारी करणार आहे. नवीन टेरिफकडून कंपनीला एआरपीयू सुधारण्यास मदत मिळणार आहे. सध्या 114 रुपये आहे. तर एअरटेल आणि जिओ यांचा एपीआरयू हा क्रमशः 157 रुपये आणि 140 रुपये आहे.

Related Stories

बांधकाम उद्योग सावरायला सुरुवात

Patil_p

ऑटो कंपन्यांचे काम पूर्ववत

Patil_p

नवीन कंपन्या 22 लाख कोटी उभारण्याचे संकेत

Amit Kulkarni

मारुती सुझुकीच्या निव्वळ नफ्यात 51 टक्के वाढ

Patil_p

एसबीआयने वाढवले व्याजदर

Patil_p

पेटीएममार्फत बुक करा सिलेंडर

Patil_p