नवी दिल्ली
व्होल्वो कार कंपनीने जुलैमध्ये जागतिक कार विक्रीत वाढ दर्शवली आहे. कंपनीने अमेरिका, युरोपसह चीनमध्ये 62 हजार 291 कार्सची जुलैत विक्री केली आहे, जी मागच्या वषीच्या याच कालावधीच्या तुलनेत 14 टक्के अधिक आहे. युरोपमध्ये कंपनीच्या गाडय़ा बऱयापैकी विक्री झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह जगभरात कार्सच्या विक्रीवर परिणाम जाणवला आहे. मागणीत म्हणावी तशी वाढ दिसलेली नाही. व्ही-60 इस्टेट आणि अमेरिकेत बनलेली 560 सेडन या गाडय़ांची मागणी चांगली दिसून आलीय. कंपनीच्या इलेक्ट्रीक किंवा प्लग-इन हायब्रीड गाडय़ांची लोकप्रियता वाढलेली दिसून आलीय. युरोपमध्ये कंपनीने 28000 हून अधिक गाडय़ा विक्री केल्या असून मागच्या वर्षाच्या तुलनेत 12 टक्के इतकी वाढ दिसून आली आहे.