Tarun Bharat

शंकरगौडा पाटील यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी भेट

 प्रतिनिधी / पणजी

गोवा व कर्नाटकमधील सौहार्दपूर्ण संबंध सुधारण्याच्यादृष्टीने कर्नाटकचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो पणजी येथे भेट घेतली. दोन्ही राज्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

दोन्ही राज्यांच्या वृद्धी व विकासावर बैठकीत चर्चा झाली. दोन्ही राज्यांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्याविषयीही चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये आर्थिक व सामाजिक विकासाशी संबंधित सर्व मुद्यांवरील मैत्रीपूर्ण उपायांवर मुख्यमंत्री सावंत समाधानी असल्याची माहिती शंकरगौडा पाटील यांनी दिली.

या बैठकीत म्हादई नदीशी संबंधित मुद्यांवरही चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी म्हादई व इतर विषयांवर झालेल्या चर्चेविषयी कर्नाटक सरकारला आपण कळवू, असे श्री. गौडापाटील यांनी सांगितले. यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कारही केला.

Related Stories

जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण आग

Archana Banage

पंजाबमध्ये शस्त्रांच्या परवान्याची होणार समीक्षा

Patil_p

बसप स्वबळावर लढविणार निवडणूक

Patil_p

विषारी मशरूम सेवनाने आसाममध्ये 13 मृत्यू

Patil_p

सोनिया गांधींच्या काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या

Patil_p

जम्मू : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 3 ठार, एकाची शरणागती

Tousif Mujawar