Tarun Bharat

शंख वाजविण्याऱयांपासून कोरोना दूर

शंख वाजविणे (शंख करणे नव्हे) ही एक कला आणि शास्त्रही आहे. शंख वाजविण्यामुळे फुफ्फुसांची क्षमता मोठय़ा प्रमाणात वाढते, असे दिसून आले आहे. त्यामुळेच की काय, सातत्याने शंख वाजविणारे लोक किंवा मंदिरांमधील पुरोहितांना कोरोनाची बाधा होत नाही, असे आढळून आले आहे. निदान असा दावा तरी केला जात आहे. झारखंडमधील देवघर जिल्हय़ातील वैद्यनाथ धाम या मंदिरातील पुजाऱयांचा हा अनुभव आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी शंखनाद करण्याची प्रथा भारतातील अनेक मंदिरांमध्ये तसेच कित्येकांच्या घरातही आहे.

देवघर येथील पुजाऱयांना ‘पंडा’ असे संबोधले जाते. असे दोन हजार परिवार या स्थानी आहेत. या सर्व परिवारांमध्ये रोजची देवपूजा करताना शंख वाजविण्याची प्रथा आहे. पंडा धर्मरक्षिणी सभा नामक एक संस्थाही त्यांनी स्थापन केली आहे. या संस्थेचे महामंत्री कार्तिकनाथ ठाकुर यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक पंडा परिवारातील सर्व सदस्य सातत्याने देवपूजेच्या वेळी शंखनाद करतात. या दोन हजार परिवारांमध्ये एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असा दावा करण्यात येत आहे. शंख वाजविल्यामुळे फुफ्फुसांना चांगला व्यायाम होत असल्याने तसेच चेहरा व श्वसन यंत्रणेचे स्नायू बळकट होत असल्याने कोरोनाची लागण होत नसावी, असे अनुमान काढण्यात आले आहे. अर्थात या अनुमानाला वैद्यक शास्त्र दुजोरा देत नसले तरी तसा अनुभव असल्याचे सांगितले जाते.

Related Stories

न्यायासाठी शंखनाद

Amit Kulkarni

पुणे : गणरायाला 500 पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य

Tousif Mujawar

‘लोकमान्यांना’ रंगावली व १०१ दिव्यांतून मानवंदना

Tousif Mujawar

90 वर्षीय व्यक्तीचे स्कायडायव्हिंग

Amit Kulkarni

पोटभर जेवा अन् मिळवा 1 लाख

Amit Kulkarni

अपत्यानि लावले आपल्या आईचे लग्न

Amit Kulkarni