Tarun Bharat

शंभर वर्षांची साथ एका वादळात उध्वस्त

वार्ताहर/ कास

ज्याने शंभर वर्षात अनेक पिढय़ांना गोडमधूर फळे दिली. त्याच्या थंडगार सावलीत गावची पोरबाळ खेळली बागडली. तरूण, म्हातारे यांनी गप्पाटप्पा केल्या. त्या महाकाय फणसाच्या वृक्षाला एकवीस तारखेला आलेल्या मोठय़ा वादळाने उध्वस्त केले. या वृक्षाचे नावही मजेशीरच.  गावकरी त्याला ढोल्या फणस म्हणून ओळखत. आता हा ऐतिहासिक अनेक पिढय़ांचा साक्षीदार ढोल्या वादळात पडल्याने गावकरी दुख व्यक्त करत आहेत. गावच्या गावठाणात ढोल्या आख्या गावचा म्हणून नांदत होता. ढोल्या नावाप्रमाणेच गोल गरगरीत असल्याने त्याचे फणस ही भलेमोठे असायचे. या फणसांची वाटणी करायची कधी वेळच आली नाही.  गावात ज्याला वाटायचं तो ढोल्याचे फणस काढून न्यायचे. कितीही काढले तरी गावाला पुरून राहतील एवढी फळे ढोल्या द्यायचा. त्याच्या गर्द सावलीत गावचे सुखदुखाचे अनेक निर्णय झाले. त्याचा ही साक्षीदार हा वृक्ष. पन ढोल्याच्या झालेल्या पडझडीने गावात घराघरात हळहळ व्यक्त होत आहे.                                 

दुर्गम कोयना जलाशयाच्या पलीकडे कांदाटी खोरे आहे. या खोर्यात गेल्यावर्षी सर्वांच्या तोंडावर असलेले जगात सर्वात जास्त पावसाचे ठिकाण चेरापुंजीला मागे टाकत लामज ता. महाबळेश्वर या गावाने पावसाचे रेकॉर्ड मोडत आपले नाव कोरले. लामजची चर्चा जगभर झाली.  पन पाऊस संपला की लामज सर्वांच्या विस्मृतीत गेले. अशा या जगातील सर्वात जास्त पाऊस पडलेल्या गावात मंगळवारी अचानक आलेल्या वादळी वार्याने होत्याचे नव्हते केले.  गावातील वीजेचे चार खांब कोसळले.  गावातील अनेक घरे, गुरांचे वाडे यांचे नुकसान झाले आहे. गावच्या वरती डोंगर माथ्यावरील लामज मुरा या वस्तीलाही वादळाचा तडाखा बसला आहे. तिथेही घरे, झाडे यांचे नुकसान झाले आहे.              

Related Stories

‘शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा’

Archana Banage

महाविद्यालये सुरू होण्याबाबत उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

Archana Banage

मुस्लिम एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदी असलम भाई बागवान

Archana Banage

शाहूपुरीतील समस्या तातडीने सोडवणार

Patil_p

ओबीसी आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

datta jadhav

संजय राऊत यांनी स्वतःला आरशात पहावे

Patil_p