Tarun Bharat

शगणमट्टी येथे जुगारी अड्डय़ावर छापा

प्रतिनिधी/ बेळगाव

शगणमट्टी (ता. बेळगाव) येथे अंदर-बाहर जुगार खेळणाऱया सहा जुगाऱयांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी हिरेबागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 4,180 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. एच. पठाण व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. शगणमट्टी येथे सार्वजनिक ठिकाणी अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून पोलिसांनी जुगाऱयांना अटक केली आहे.

इदायत इस्माईल शेख (वय 28, रा. उज्ज्वलनगर), हेमंतखान अमीरखान पठाण (वय 28, रा. पाटील गल्ली), सद्दाम महम्मद शेख (वय 29, रा. संभाजी रोड), सलीम महम्मद सय्यद (वय 48, रा. पाटील गल्ली), महम्मदगौस महम्मदअली नेसरगी (वय 26, रा. कसई गल्ली), रमेश अशोक पाटील (वय 54, रा. शगणमट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱयांची नावे असून त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 87 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

रमेश कुमारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून वादंग

Amit Kulkarni

पोलिसांनी घेतली बॅण्ड मालकांची बैठक

Amit Kulkarni

रॉजर क्लब-सिग्नेचर क्लब यांच्यात आज अंतिम सामना

Amit Kulkarni

नव्या होतकरू उमेदवारांना निवडून देण्याचा चंग

Patil_p

गणोत्सव आज होणार झी म्युझिक मराठीवर प्रदर्शित

Patil_p

एलआयसी ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनची सर्वसाधारण सभा

Amit Kulkarni
error: Content is protected !!