Tarun Bharat

शनाया कपूरकडून चित्रिकरणास प्रारंभ

Advertisements

संजय कपूरची मुलगी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

चर्चित स्टारकिड्सपैकी एक शनाया कपूरने स्वतःच्या पदार्पणातील चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. संजयने शनायासोबतची अनेक छायाचित्रे शेअर करत नवी सुरुवात असून प्रचंड मेहनत करा, एकाग्र हो, स्काय इज लिमिट म्हणत स्वतःच्या मुलीचा उत्साह वाढविला आहे.

करण जौहरकडून संधी

शनाया आता करण जौहरची टॅलेंट एजेन्सी धर्मा कॉर्नरस्टोनचा हिस्सा आहे. करणने मार्च महिन्यात शनायासोबत काम करण्याची घोषणा केली होती. चित्रपटापूर्वी शनाया एका कमर्शियल जाहिरातीत दिसून आली आहे. या जाहिरातीला शेअर करत करणने शनायाचे प्रचंड कौतुक केले होते.

अनन्याची मैत्रीण

शनाया ही अनन्या पांडेची घनिष्ठ मैत्रिण आहे. अनन्याने करणच्या स्टुडंट ऑफ द ईयर-2 या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनयापूर्वी शनायाने स्वतःची चुलत बहिण जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना ः द कारगिल गर्ल’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले होते.

Related Stories

अर्धा नर अन् अर्धी मादी असलेला पक्षी

Amit Kulkarni

सरदार उधम ऑस्करसाठी न पाठवण्याचा निर्णय व्यक्तिनिष्ठ : शूजित सरकार

Abhijeet Shinde

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मालिकेत राजगृह प्रवेश

Patil_p

स्पायडर मॅन नो वे होम’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

ईशा गुप्ताचे इन्स्टाग्रामवर 7 दशलक्ष फॉलोअर्स

Patil_p

मामि अध्यक्षपदाचा दीपिकाने दिला राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!