Tarun Bharat

शनिवारपासून भाजीमार्केट एपीएमसीत भरणार?

प्रतिनिधी /बेळगाव :

 शहराबाहेर असलेले भाजीमार्केट एपीएमसीमध्ये पूर्वरत सुरू करण्याची परवानगी द्यावी अशा मागणीसाठी शुक्रवारपासुन भाजी मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा विचार भाजीमार्केट विपेता संघटनेने चालविला होता. मात्र शनिवारपासून एपीएमसीत भाजीमार्केट भरविण्याचे आश्वासन एपीएमसी अध्यक्षांनी दिली असल्याने  आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी भाजीमार्केट सुरू राहणार आहे.

कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना आवश्यक साहित्य तसेच भाजीपाला मिळणे मुश्किल बनले. त्याकरिता नागरिकांनी एपीएमसी भाजीमार्केटमध्ये धाव घेतली. त्यामुळे भाजीमार्केटमध्ये किरकोळ खरेदीसाठी नागरीकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यास एपीएमसीसह जिल्हा प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे एपीएमसी मधील भाजीमार्केटच शहराबाहेर हलविण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने बजावला. त्यामुळे हिंडाल्को, ऑटोनगर आणि अलारवाड क्रॉस आदि ठिकाणी तात्पुरते भाजी मार्केट सुरू करण्यात आले. मात्र वळीव पावसामुळे अलारवाड क्रॉस येथील भाजीमार्केटमधील मंडपाचे पत्रे उडून गेले. तसेच मंडप खराब झाल्याने आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने मार्केटची दैनावस्था झाली होती. त्यामुळे अलारवाड क्रॉस येथील भाजीमार्केट पूर्णपणे बंद करण्यात आले. येथील व्यापाऱयांना ऑटोनगर येथे दुकाने सुरू करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे दोन ठिकाणी भाजी मार्केट सुरू आहे. पण या ठिकाणी कोणतीच सुरक्षा नसल्याने शेतकऱयांचे उत्पादन रामभरोसे आहे. विक्री न झालेली पिके मार्केटमध्येच पडून असतात. पण या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून आवश्यक उपाय योजना राबविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शिल्लक मालाची चोरी होत असल्याच्या तक्रारी व्यापारी करीत आहेत. तसेच काही व्यापाऱयांच्या वजन काटय़ाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱयांसह मार्केटमधील व्यापाऱयांसाठी कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासुन गैर सोयीचा सामना करावा लागत आहे. पश्चिम भागातील शेतकऱयांना  ऑटोनगरला जाण्यास लांब होत आहे. पश्चिम भागातील शेतकऱयांना मोठय़ा अडचणीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंडाल्को येथील भाजीमार्केटमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांसह भाजी विपेत्यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत असून, भाजीमार्केट एपीएमसीमध्ये पूर्वरत सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याबाबत व्यापाऱयांनी एपीएमसीचे अध्यक्ष आनंद पाटील यांची गुरूवारी भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच शेतकऱयांची गैरसोय टाळण्यासाठी एपीएमसीतच भाजीमार्केट सुरू करावे, अशी विनंती केली आहे. शनिवारपासून एपीएमसीतच व्यवहार सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन एपीएमसी अध्यक्षांनी दिले आहे. त्यामुळे शुक्रवारी भाजीमार्केट आहे त्या ठिकाणीच भरविण्यात येणार असून शनिवारपासून एपीएमसीत व्यवहार सुरू करावेत असे आवाहन जय किसान होलसेल भाजीमार्केट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 एपीएमसीमधील भाजी मार्केट गेल्या दोन महिन्यापासुन अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱयांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच व्यापाऱयांना देखील विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत भाजीमार्केट मधील व्यापाऱयांनी भेट घेतली असून, शुक्रवारी कामकाज बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून शनिवारपासून भाजीमार्केट एपीएमसीमध्येच सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती एपीएमसीचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी दिली.

Related Stories

बसफेऱया कमी… प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची फरफट

Amit Kulkarni

बेकिनकेरे-उचगाव मार्गावर झाड कोसळले

Omkar B

बुधवारी जिल्हय़ात उच्चांकी 757 नवे रुग्ण

Amit Kulkarni

अनगोळ ते बेम्कोपर्यंत वाहतुकीची कोंडी

Amit Kulkarni

वडगाव-येळ्ळूर रस्त्यावरील झाड तोडल्याने कोंडी

Amit Kulkarni

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी 1,11,111 ची देणगी

Amit Kulkarni