Tarun Bharat

शनिवारवाडयाच्या फुलांच्या प्रतिकृतीमध्ये शिवरायांच्या मूर्तीचे पूजन

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शासनाच्या आदेशाचे पालन करुन शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. आकर्षक फुलांनी सजविलेल्या शनिवारवाडयाच्या भव्य प्रतिकृतीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. 


कोतवाल चावडी येथे झालेल्या कार्यक्रमात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, सचिन आखाडे, विशाल केदारी, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 


प्रकाश चव्हाण म्हणाले, दरवर्षी शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रसंग भव्य रंगमंचावर नाटकाद्वारे सादर केले जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांचे पालन करीत आम्ही केवळ पुष्पसजावट केली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्यविषयक उपक्रम राबविले असून यापुढेही सामाजिक उपक्रम राबविणार आहे.

Related Stories

देशातील पहिले ग्रीन व्हिलेज

Amit Kulkarni

अज्ञातामुळे मिळाले 31 कोटी रुपये

Patil_p

जगातील सर्वात धोकादायक सरोवर

Patil_p

6 वर्षीय मुलीने केली कमाल

Patil_p

सर्वात उंच व्यक्ती चर्चेत

Amit Kulkarni

Special Story; रणजी ट्रॉफी : मध्यप्रदेशचा बलाढ्य मुंबईवर विजय

Kalyani Amanagi
error: Content is protected !!