Tarun Bharat

शनिवारी तब्बल 280 नवे कोरोनाबाधित रुग्ण

प्रतिनिधी/ पणजी, मडगाव

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत काल शनिवारी सर्वाधिक वाढ झाली असून काल तब्बल 280 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता 1707 झाली. आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 48 झाला आहे. काल 227 रुग्ण कोरोनामुक्त झालेत.

राज्यात आता सर्वच ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राजधानी पणजीतील रुग्णसंख्या 80 झाली आहे. वास्कोची रुग्णसंख्या 390 झाली आहे. कुठ्ठाळीत 334, मडगाव 110, म्हापसा 59, वाळपई 30, पेडणे 15, सांखळी 32, डिचोली 6, हळदोणा 18, बेतकी 13, कांदोळी 36, कासारवर्णे 6,   कोलवाळ 27, खोर्ली 13, चिंबल 87, शिवोली 17, पर्वरी 34, मये 5, कुडचडे 19 तर काणकोणची रुग्णसंख्या 3 झाली आहे. 

बाळ्ळीत 48, कासावली 21, चिंचिणी 2, कुडतरी 43, लोटली 34, मडकई 19, केपे 17, सांगे 6, शिरोडा 11, धारबांदोडा 19, फोंडा 89 तर नावेलीतील रुग्णसंख्या 31 झाली आहे. रस्ता, रेल्वे व हवाईमार्गे आलेल्या रुग्णांची संख्या घटून 33 वर आली आहे.

कोरोनाकडे दुर्लक्षामुळे बळी

कोरोनाकडे दुर्लक्ष करणे खुपच घातक आहे. ताप आला तरी डॉक्टरकडे न जाता घरीच थांबून राहिल्याने आतापर्यंत दोघां-तिघांचे बळी गेले होते. त्यात काल आणखीन दोघांची भर पडली. आकें-मडगाव येथील एक 65 वर्षीय व्यक्ती बकरी ईद निमित्त वेळीच हॉस्पिटलात गेली नाही आणि जेव्हा गेली तेव्हा कोविड हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी विभागात तिचा बळी गेला. तर वेळसांव येथील 72 वर्षीय महिलेला गोमेकॉत अशाच प्रकारे मृत्यू आला. त्यामुळे गोव्यातील एकूण बळीची संख्या 48 वर पोचली आहे.

काल शनिवारी दिवसभरात एकूण तिघांचे बळी गेले. त्यात तिसरी व्यक्ती बेंती-वेंरे येथील असून कोविड हॉस्पिटलात उपचार घेत असताना तिचा बळी गेला. ही व्यक्ती 74 वर्षाची असून तिला 28 जुलै रोजी कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते व तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.

आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते

ताप व सर्दी सारखी लक्षणे असल्यास जवळच्या आरोग्य केंद्राकडे संपर्क साधणे खुपच महत्वाचे आहे. लोकांना वारंवार आवाहन करून देखील लोक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आकें-मडगाव येथील 65 वर्षीय व्यक्तीने केवळ ‘बकरी ईद’ निमित्त डॉक्टरकडे जाण्याचे टाळले. काल जेव्हा त्याला  रुग्णवाहिकेतून कोविड हॉस्पिटलात आणले गेले होते, तेव्हा या व्यक्तीचे प्रकृती प्रचंड ढासळली होती. कॅज्युअल्टीत दाखल करण्यात आले असता तिचा बळी गेला. वेळसांव येथील महिलेचा गोमेकॉत बळी

बेळे-वेळसांव येथील 72 वर्षीय महिलेची मुलगी गोमेकॉत नर्स म्हणून कार्यरत होती. तिला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तिच्या मुलांना तसेच पतीला कोरोना निगा केंद्रात दाखल करण्यात आले होते. तर तिची आई व वडील यांची प्रकृती ठिक असल्याने, त्यांना चाचणीसाठी नेण्यात आले नव्हते. मात्र, शुक्रवारी आईला बरे वाटत नसल्याने, तिला चिखली हॉस्पिटलात नेण्यात आले. चिखली हॉस्पिटलात तिला घेरी आली. यावेळी डॉक्टरांनी तिला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्वरित गोमेकॉत पाठवून दिले. गोमेकॉत पहाटे 4 वा. तिचा बळी गेला.

गोमेकॉत नर्स असलेल्या मुली सोबत जर आई-वडिलांची चाचणी घेतली असती तर कोरोनाचे निदान झाले असते. मात्र, प्रकृती ठिक असल्याचे गृहित धरून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे या महिलेच्या जिवावर बेतले.

अतिदक्षता विभाग पुन्हा पाच रुग्ण

कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात पाच रुग्ण असून आयसीयूमध्ये 13 जण उपचार घेत आहेत. हे सर्वजण क्रिटीकल म्हणून बघितले जात आहे. काल दिवसभरात एकूण 15 रुग्ण नव्याने भरती झाले तर पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Related Stories

डॉ.पी.एस.रामाणी संग्रहालयाचे 14 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni

न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर कर्लीज पूर्णतः जमिनदोस्त

Amit Kulkarni

कुडचडे पालिकेची कचरावाहू वाहने गंजत पडून

Amit Kulkarni

खाणी सुरू करण्यासाठी आता दिल्लीत बैठक

Patil_p

काणकोणात लॉकडाऊन दुसऱया दिवशीही यशस्वी

Patil_p

1971च्या युद्धाची आठवण ‘स्वर्णिम विजय वर्ष’

Amit Kulkarni