बेळगाव : शब्दगंध कवी मंडळाची मासिक बैठक नुकतीच अश्विनी ओगले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच निवासस्थानी पार पडली. या बैठकीत मंडळातर्फे विविध उपक्रम राबविणे, चर्चासत्र, कवी संमेलने, व्याख्याने आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणे, मंडळाचा लोगो तयार करणे यावर चर्चा झाली. या बैठकीत हर्षदा सुंठणकर यांना काव्य स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व्ही. एस. वाळवेकर यांनी स्वागत केले. प्रा. अशोक अलगोंडी यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर गावडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. निलेश शिंदे यांनी आभार मानले. या सर्वांसह वंदना कुलकर्णी, स्मिता किल्लेकर, परशराम खेमणे, नितीन आनंदाचे, पुष्कर ओगले यांनी कृ. ब. निकुम्ब यांच्या कवितांचे वाचन केले.


previous post