Tarun Bharat

शरजीलवर देशद्रोहाचा गुन्हा, दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी च्या विरोधात भडकाऊ भाषण करणाऱ्या शरजील इमामच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या साकेत कोर्टात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. शरजीलवर देशद्रोही भाषण करून हिंसाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान, जामिया मध्ये 13 डिसेंबर रोजी भडकाऊ भाषण आणि दंगल केल्या प्रकरणी 28 जानेवारीला दिल्ली पोलिसांनी शरजील ला बिहार मधून अटक केली होती. त्यानंतर आज म्हणजेच तब्बल दोन महिन्यांनी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी या काळात झालेला हिंसाचार आणि दंगली मध्ये सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

Related Stories

जगातील सर्वात उंच शिवप्रतिमेचे लोकार्पण

Patil_p

कोरोना मुकाबल्यासाठी पाकिस्तान घेणार 150 कोटी डॉलर्सचे कर्ज

datta jadhav

सैन्याच्या मानवाधिकार शाखेचा अध्यक्ष नियुक्त

Patil_p

स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवीत वाढ

Patil_p

संजय राऊतांकडून अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याचे समर्थन

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू

prashant_c