Tarun Bharat

“शरद पवारांची भूमिका शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारी..”

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांचा आरोप

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तीन टप्प्यातल्या एफआरपी बाबत घेतलेली भूमिका शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केला आहे.

दहा वर्षापासून सातत्याने आंदोलन करून अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी गुन्हे दाखल करून घेतले आहेत. अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. खा. राजू शेट्टी यांनी तीन वेळा प्राणांतिक उपोषण केले होते. त्यागातून हा कायदा तयार झालेला आहे आणि हा कायदा मोडण्यासाठी काही कारखानदार व सत्तेतील पुढारी सरकारची दिशाभूल करत आहेत. अशा लोकांची बाजू शरद पवार यांनी घेणे म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखेच आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत हेच साखर कारखानदार डुबत्या जहाजातून पक्षाला सोडून पळून गेली होती. पण आपण सातारा येथील सभेत पावसात भिजला आणि हाच ऊस उत्पादक शेतकरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, याचं बक्षिस आम्हाला तुम्ही देत आहात का ? असाच सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी शरद पवार यांना विचारला आहे.

कोरोना, महापुर, अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून पडला असताना शेतातील उभ्या असलेल्या ऊसावर शेतकऱ्यांना कोरोनात दवाखान्यासाठी काढलेलं कर्ज, बँक सोसायटी पतसंस्थेचे कर्ज, लाईट बिल, मुलांचे शिक्षण, खते, बी-बियाणे, किराणा दुकानदार उधारी, मुलीच्या लग्नकार्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक खर्च करावा लागला आहे. “एक रकमी एफआरपी आमच्या हक्काची” या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शरद पवार यांना ऊस उत्पादक शेतकरी पत्र पाठवून देणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील व जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पत्र पाठवण्याचे आवाहन सचिन पाटील यांनी केले आहे.

कायदा मोडीत निघाला तर कोट्यावधीची ऊस बिले बुडतील

एकरकमी एफआरपीचा कायदा असताना साखर कारखानदार एक वर्ष झाले तरी बिल देत नाहीत. कायदा मोडीत निघाला तर ऊसाची बिलं बुडतील. या आधीही कोट्यवधीची ऊसबिले बुडली आहेत. त्यामुळे कायदा टिकला पाहिजे.

Related Stories

उजनीतून नदीला आणि कालव्याला 21 मार्चपासून आवर्तन

Archana Banage

मास्क न वापरल्यास आता 500 रुपयांचा दंड

Archana Banage

अक्कलकोटमधील मृत व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Archana Banage

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे ते आर्थिक संकट उभे ठाकले आहे – खा. शरद पवार

Archana Banage

पंढरपूर येथे अन्न व औषध प्रशासनाकडून तंबाखू, सुपारी जप्त

Archana Banage

सोलापूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत लोकसहभाग घ्या : जिल्हाधिकारी

Archana Banage