Tarun Bharat

शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेवर राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी शुक्रवारी, ‘आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो. तशीच अवस्था आज काँग्रेसची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. शरद पवारांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच शरद पवारांच्या या टीकेवर को काँग्रेस नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी ‘काँग्रेसने ज्यांना ‘पॉवर’ दिली त्यांनीच घात केला’ अशी टीका शरद पवारांवर केली आहे. यातच आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शरद पवारांनी काँग्रेसची तुलना नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासोबत केल्याने राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून हे सोयीचं राजकारण असून आदर्श राजकारणी म्हणणार नाही अशा शब्दांत टीका केली आहे.

Related Stories

कारागृह नव्हे, सुधारगृह…!

NIKHIL_N

गरीब शेतकऱयाचे वीजबिल तब्बल 32 हजार

Patil_p

मोरजकर यांना राज्यस्तरीय प्रगतशील शेतीरत्न पुरस्कार

NIKHIL_N

वेंगुर्ले पाटकर हायस्कूल आणि रा. सी. रेगे जुनियर कॉलेज येथे ऑगस्ट क्रांती दिन साजरा

Anuja Kudatarkar

अन्यथा नवरात्रोत्सवात कीर्तने सुरू करणार

Patil_p

गोव्याला मैदा नेणारा ट्रक माजगावला उलटला

NIKHIL_N
error: Content is protected !!