Tarun Bharat

शरद पवार उद्या कोल्हापुरात; शाहू महाराज समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा

प्रतिनिधी / कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या, दि. १८ रोजी कोल्हापुरात येणार आहेत. पवार यांच्या हस्ते शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. दसरा चौकात होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज असणार आहेत.

शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, सतेज पाटील आदी मंत्रीही कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता शरद पवार यांचे हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील.

पवार हे दुपारी ३ वाजता हातकणंगले तालुक्यातील किणी (वठार) येथे प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ४.३० वाजता ते हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील.

Related Stories

गोकुळकडून सिध्‍दगिरी हॉस्‍पीटलला व्‍हेंटिलेटर प्रदान

Archana Banage

आवाडेंना काँग्रेसमध्ये आणण्याची जबाबदारी पी.एन.पाटील यांच्यावर

Archana Banage

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद

Archana Banage

कोपार्डे जनावरांचा बाजार ७ महिन्यानंतर होणार सुरू

Archana Banage

गडहिंग्लज येथे झाड अंगावर पडून आजी-नातवाचा जागीच मृत्यू

Archana Banage

मुरगूड येथे विजेच्या धक्क्याने ग्रंथपालांचा मृत्यू

Archana Banage