ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, शरद पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात ॲडमिट करण्यात येणार असून त्यांच्यावर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल.


तसेच शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.