Tarun Bharat

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज !

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना चार दिवसानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवार सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 


काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आजच सकाळी शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे सांगितले होते. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना विनंती आहे की, त्यांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्याने त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावे असे आवाहनही केले होते. 


दरम्यान, शरद पवार यांना गेल्या मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी (30 मार्च) उशिरा रात्री पित्ताशयामध्ये अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे. यासंदर्भात देखील डॉक्टर निर्णय घेणार आहेत. 


दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती. 

Related Stories

‘देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेतृत्व संपविले’

Archana Banage

सलील पारेख यांची इन्फोसिसच्या प्रमुखपदी नियुक्ती

Abhijeet Khandekar

शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई ; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

Archana Banage

चामराजनगर : २४ जणांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे : समितीचा अहवाल सादर

Archana Banage

भरतगाववाडी येथील माजी सैनिकांच्या पत्नींकडून बचतीचा आदर्श

Archana Banage

डॉ. पतंगराव कदम यांचे कार्य दीपस्तंभासारखे : डॉ. डी. जी. कणसे

tarunbharat
error: Content is protected !!