बागायत 37 लाख 15 हजार, पाण्याचा स्रोत असलेली जमीन 28 लाख 53 हजार तर माळवट 22 लाख प्रति एकर : दुसऱया क्रमांकावर अनगोळ ग्रामीण
गंगाधर पाटील / बेळगाव
शहराचा विस्तार वाढत चालला असताना अनेक उपनगरे तयार झाली. ग्रामीण भागातील जमिनी घेऊन ही नगरे तयार झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील जमिनींच्या दरांनी उच्चांकी दर गाठला. त्यामुळे मुद्रांक आणि नोंदणी खात्यालाही याची दखल घ्यावी लागली आणि शेत जमिनीच्या दरामध्ये वाढ केली. शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये वडगाव शिवाराला सर्वात जास्त दर निश्चित करण्यात आला. त्या पाठोपाठ अनगोळ ग्रामीण भागातील शिवारालाही महत्त्व प्राप्त झाले. त्या खालोखाल शहापूर शिवारातील जमिनींचे दर आहेत.
शहराच्या दक्षिण भागात असलेल्या वडगाव येथील बागायत जमिनींचे दर 37 लाख 15 हजार, पाण्याचा स्रोत असलेली जमीन 28 लाख 53 हजार आणि माळवट जमिनीला 22 लाख रुपये प्रति एकर दर निश्चित करण्यात आला. त्या खालोखाल अनगोळ ग्रामीण भागातील बागायत जमिनीला 30 लाख, पाण्याचा स्रोत असलेल्या जमिनीला 19 लाख 86 हजार आणि माळवट जमिनीला 15 लाख रुपये दर प्रति एकर निश्चित करण्यात आला आहे.
वडगाव, अनगोळनंतर मजगाव येथील जमिनींचे दरही भडकले आहेत. बागायत जमीन 28 लाख, पाण्याचा स्रोत असलेली जमीन 21 लाख 40 हजार, माळवट जमिनीचा दर 16 लाख प्रति एकर निश्चित करण्यात आले आहेत. मजगावनंतर पिरनवाडी परिसरातील बागायत जमिनीला 22 लाख, पाण्याचा स्रोत असलेल्या जमिनीला 16 लाख 10 हजार आणि माळवट जमिनीला 13 लाख 50 हजार, मच्छे येथील बागायत जमिनीला 21 लाख 33 हजार, पाण्याचा स्रोत असलेली जमीन 15 लाख 45 हजार तर माळवट जमिनीला 11 लाख रुपये प्रति एकर दर आहेत.
दक्षिणबरोबरच पश्चिम भागात जमिनींच्या दरामध्येही वाढ करण्यात आली आहे. पश्चिम भागात सर्वात जास्त उचगावच्या जमिनीचे दर आहेत. उचगावातील बागायत जमिनीला 16 लाख 28 हजार रुपये, पाण्याचा स्रोत असलेल्या जमिनीला 14 लाख 20 हजार रुपये, माळवट जमिनीला 11 लाख 20 हजार रुपये, बेनकनहळ्ळी बागायत जमीन 16 लाख, पाण्याचा स्रोत असलेली जमीन 12 लाख 5 हजार, माळवट जमीन 8 लाख रुपये, मंडोळी गावातील बागायत जमिनीला 14 लाख 41 हजार, पाण्याचा स्रोत असलेल्या जमिनीला 10 लाख 50 हजार तर माळवट जमिनीला 8 लाख 70 हजार रुपये, कल्लेहोळ बागायत जमीन 6 लाख, पाण्याचा स्रोत असलेली जमीन 5 लाख 10 हजार रुपये, माळवट जमिनीला 3 लाख 80 हजार रुपये प्रति एकर दर निश्चित करण्यात आला आहे.
पश्चिम भागातीलच बेळगुंदी, बिजगर्णी, राकसकोप, कुदेमनी या परिसरातील जमिनींचे दरही वाढविण्यात आले आहेत. 5 लाख 60 हजार बागायत जमिनीचे दर आहेत. पाण्याचा स्रोत असलेली 4 लाख 85 हजार, माळवट जमिनीला 3 लाख 80 हजार रुपये प्रति एकर दर आहेत. बागायत जमिनीपेक्षाही बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याला असलेल्या माळवट जमिनीचे दर मुद्रांक आणि नोंदणी खात्याने कमी केले असले तरी प्रत्यक्षात रस्त्याला लागून असलेल्या जमिनीला अधिक मागणी आहे.
सध्या हे दर निश्चित करण्यात आले तरी प्रत्यक्षात मात्र या दरापेक्षा चार पट अधिक दराने जमीन खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. अधिक दराने खरेदी केली तरी खरेदी करताना मात्र मुद्रांक आणि नोंदणी खात्याने निश्चित केलेल्या दराची नोंद करून त्यावरच कर भरण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष होणारा व्यवहार आणि सरकारी दरामध्ये मोठी तफावत आहे.
दक्षिण भागातील जांबोटी रस्त्यावरील संतिबस्तवाड येथील बागायत जमिनीचा दर 12 लाख 50 हजार, पाण्याचा स्रोत असलेली जमीन 10 लाख 20 हजार रुपये, माळवट 8 लाख, धामणे येथील 12 लाख 35 हजार बागायत जमीन, पाण्याचा स्रोत असलेली 8 लाख 40 हजार तर 7 लाख 30 हजार रुपये माळवट जमीन, झाडशहापूर येथील बागायत जमिनीचे दर 10 लाख 33 हजार रुपये, पाण्याचा स्रोत असलेली जमीन 7 लाख 12 हजार रुपये तर माळवट जमिनीचा दर 5 लाख 10 हजार रुपये, येळ्ळूर येथील बागायत जमिनीचा 8 लाख 7 हजार रुपये, पाण्याचा स्रोत असलेल्या जमिनीचे दर 6 लाख 70 हजार रुपये आहेत. माळवट जमिनीचे दर 5 लाख 90 हजार रुपये, देसूर येथील बागायत जमिनीचे दर 8 लाख 5 हजार रुपये, पाण्याचे स्रोत असलेली जमीन 4 लाख 85 हजार रुपये, माळवट जमिनीचे दर 3 लाख 80 हजार रुपये, किणये-कर्ले बागायत जमीन 5 लाख 72 हजार, पाण्याचा स्रोत असलेली जमीन 5 लाख, माळवट जमीन 3 लाख 90 हजार रुपये प्रति एकर दर निश्चित करण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये वडगाव व अनगोळचा विस्तार वाढत चालला आहे. वडगाव परिसरात अनेक नगरे झाली. याचबरोबर वेगवेगळी हॉस्पिटल, औद्योगिक वसाहती वाढत असल्यामुळे हा दर वाढत चालला आहे. शहराच्या दक्षिण विभागातील झाडशहापूर, पिरनवाडी, मच्छे, किणये, कर्ले या परिसराचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे जमिनीदेखील मिळणे अवघड होत आहे.
मुद्रांक आणि नोंदणी विभागाने हे दर निश्चित केले तरी प्रत्यक्षात मात्र अधिक दराने खरेदी-विक्री व्यवहार सुरू आहेत. वास्तविक सुपीक जमिनी मिळणे कठीण झाले आहे. एखादा जमीन विकत असेल तर खरेदीदारांची त्यांच्याकडे चढाओढ लागलेली असते. त्यामुळे जमिनीचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत.
बेळगाव ग्रामीणमधील दक्षिण आणि पश्चिम भागातील दर
मिळकतीचे बाजारमूल्य (प्रति. एकर)
गाव | बागायत जमीन | पाण्याचा स्रोत जमीन | माळवट जमीन |
वडगाव ग्रामीण | 37 लाख 15 हजार | 28 लाख 53 हजार | 22 लाख |
अनगोळ ग्रामीण | 30 लाख | 19 लाख 86 हजार | 15 लाख |
शहापूर शिवार | 27 लाख 83 हजार | 21 लाख 52 हजार | 16 लाख |
पिरनवाडी | 22 लाख | 16 लाख 10 हजार | 13 लाख 50 हजार |
मच्छे | 21 लाख 33 हजार | 15 लाख 45 हजार | 1 लाख 10 हजार |
उचगाव | 16 लाख 28 हजार | 14 लाख 20 हजार | 11 लाख 20 हजार |
बेनकनहळ्ळी | 16 लाख | 12 लाख 5 हजार | 8 लाख |
मंडोळी | 14 लाख 41 हजार | 10 लाख 50 हजार | 8 लाख 70 हजार |
संतिबस्तवाड-जांबोटी रोड | 12 लाख 50 हजार | 10 लाख 20 हजार | 8 लाख |
झाडशहापूर | 10 लाख 33 हजार | 7 लाख 12 हजार | ख5 लाख 10 हजार |