Tarun Bharat

शहराच्या पाणीपुरवठय़ात सोमवारपर्यंत व्यत्यय

जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू

प्रतिनिधी / बेळगाव

शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिडकल जलवाहिनीच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले. मात्र काही ठिकाणी जलवाहिन्या सिमेंटच्या असल्याने गळती लागून पाणी वाया जात आहे. त्यामुळे जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दि. 7 व 8 असे दोन दिवस चालणार असून पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार आहे. हिडकलमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गळतीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. यापूर्वी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. पण पुन्हा गळती लागली आहे. सतत पाणी वाहत असल्याने जलवाहिन्या बदलण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. या जलवाहिनीद्वारे चोवीस तास पाणीपुरवठा केला जात असल्याने सिमेंटच्या जलवाहिन्यांवर ताण वाढत आहे. त्यामुळे जलवाहिनीची दुरूस्ती करण्याऐवजी जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन दिवस काम चालणार असून सिमेंटचे पाईप काढून लोखंडी जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. सदर जलवाहिनीला वेल्डिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे हिडकल जलाशयामधून जलशुद्धीकरण केंद्रात करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला आहे. मात्र शुक्रवारी सकाळपासून जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर काम दोन दिवस चालणार असून शनिवारी रात्रीपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू होईल. पण सोमवारपर्यंत शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा मंडळाने केले आहे.

Related Stories

रेशनचा तांदूळ खरेदी करण्याचा सुळगे (हिं.) येथे सपाटा

Omkar B

पोलीस कुटुंबासाठी घातवार

Amit Kulkarni

इंडियन क्राफ्ट बाजारला बेळगावकरांचा वाढता प्रतिसाद

Amit Kulkarni

बडेकोळमठात रथोत्सव मिरवणूक उत्साहात

Amit Kulkarni

रामदुर्ग तालुक्यात 520 जागांसाठी 1736 अर्ज दाखल

Patil_p

जबाबदारी टाळण्यासाठी रेल्वेगेटवर बॅरिकेड्स

Amit Kulkarni