Tarun Bharat

शहरातील बसथांबे बनले पार्किंग तळ

स्मार्ट बसथांब्यावर बसऐवजी चारचाकी वाहने पार्किंग : बसप्रवाशांची गैरसोय, कॅन्टोन्मेंटसह वरिष्ट अधिकाऱयांनी लक्ष देण्याची मागणी

प्रतिनिधी/बेळगाव

दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळणे मुश्कील बनले आहे. आता स्मार्ट बसथांब्यावर बसऐवजी चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. परिणामी धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्याला वाहनतळाचे स्वरुप आल्याने बसथांबा की वाहनतळ, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

एरवी बसथांब्यांवर वडाप वाहने थांबविण्यात येत असल्याने बसप्रवाशांना अडचणीचे ठरते. पण आता बसथांब्यांचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. बाजारपेठेंतर्गत बापट गल्ली येथे महापालिकेचे एकमेव वाहनतळ आहे. त्याबरोबर काही ठिकाणी खासगी वाहनतळ आहेत. पण शहरातील दुचाकी वाहनांची संख्या पाहता ही वाहनतळे अपुरी पडत आहेत. विशेषतः बेळगाव बाजारपेठेत परराज्यातील ग्राहक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे चारचाकी वाहनांच्या पार्किंगची समस्या भेडसावत असते. शहरात बहुमजली पार्किंग उभारण्यासाठी प्रयत्न झाले पण पार्किंग तळ उभारण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. बाजारपेठेत चारचाकी वाहनांसाठी पार्किंग तळ नसल्याने मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी चारचाकी वाहनचालक वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या आता नेहमीचीच बनली असून, विशेषतः सणासुदीच्या काळात अधिक भेडसावते. सणानिमित्त खरेदीसाठी येणाऱया चारचाकी वाहनधारकांना बाजारपेठेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे बाजारपेठेबाहेरच वाहने पार्क करावी लागतात. पण बाजारपेठेबाहेरदेखील वाहने पार्क करण्याची सुविधा नाही. तसेच कॉलेजरोडवर वाहने पार्क केल्यास रहदारी

पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहने कुठे पार्क करायची, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. दिवाळी सणाच्या खरेदीसाठी येणारे नागरिक चक्क स्मार्ट बसथांब्यावरच वाहने पार्क करीत आहेत. दुसऱया बाजूस कॅन्टोन्मेंटने पार्किंगची सुविधा केली आहे. या ठिकाणी पार्किंग शुल्क आकारला जातो. पण आता स्मार्ट बसथांब्यावरही वाहने पार्क करून शुल्क आकारणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. धर्मवीर संभाजी चौकात असलेल्या बसथांब्यावर चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे बसथांबा की वाहनतळ, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

बसप्रवाशांची गैरसोय

चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने बसप्रवाशांची गैरसोय होत आहे. बसथांबा शेडमध्ये प्रवासी थांबतात, पण या ठिकाणी वाहने पार्क केली जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवासी बसशेड ऐवजी रस्त्यावर थांबत असल्याचे आढळून आले आहे. या स्मार्ट बसथांब्यावर वाहने पार्क केली जात असल्याने बसथांब्याचा वापर पार्किंगसाठी होणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. कॅन्टोन्मेंटसह वरि÷ अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 

Related Stories

स्वतःपेक्षा आम्हाला काळजी उंटांचीच!

Amit Kulkarni

‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी मिळविणारे डॉ. प्रभाकर कोरे पहिले भारतीय

Amit Kulkarni

कंग्राळीतील श्रीमूर्ती विसर्जन कुंड स्वच्छ करा

Amit Kulkarni

रेल्वे यार्डमध्ये अनोळखी युवकाचा संशयास्पद मृत्यू

Amit Kulkarni

हलशी मराठी शाळेचा अमृतमहोत्सव एप्रिलमध्ये

Amit Kulkarni

गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

Amit Kulkarni