Tarun Bharat

शहरातील मिरवणूक मार्गांचा होणार विकास

बेळगाव  / प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱया नदगुंदकर भावे चौकात शनिवारी शहरातील विविध मार्गांच्या नवीन रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पूजन करून या रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, हेमू कलानी चौक, काकतीवेस रोड, चन्नम्मा सर्कल आदी मार्गांवरून शिवजयंती, गणशोत्सव, आंबेडकर जयंती व इतर मिरवणुका निघतात. या मार्गांचे डांबरीकरण करून विकास साधण्यात येणार आहे. त्याबरोबरच या मार्गावर डेकोरेटिव्ह विद्युतखांब उभारून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मिरवणूक मार्ग आता नव्या रुपात दिसणार आहेत. या कामासाठी 1 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर असून 80 लाखांच्या निधीतून डांबरीकरणाचे काम होणार आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली. शहरातील मध्यवर्ती व सतत गजबजणाऱया मार्गांचा विकास साधण्यात येणार असून लवकरच डेकोरेटिव्ह खांबांच्या दिव्यांनी मार्ग उजळणार आहे. याप्रसंगी सुनील जाधव, विजय जाधव, हेमंत हावळ, राजकुमार खटावकर, संजय पाटील, गणेश लंगरकांडे, कपिल भोसले, रमेश पावले, बाबुलाल राजपुरोहित, विजय हंचीनमनी यासह परिसरातील व्यापारी, भाजीविपेते उपस्थित होते..

Related Stories

कर्नाटक : ललिता महल पॅलेसचा 100 वा वाढदिवस

Abhijeet Khandekar

बंदोबस्तात युसुफभाई तरीही पोलिसांची ढिलाई!

Amit Kulkarni

श्री रेणुका यल्लम्मा देवस्थान 31 पर्यंत दर्शनासाठी बंद

Amit Kulkarni

पासपोर्टकरिता अद्यापही हुबळी फेरी

Patil_p

खासबाग येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Amit Kulkarni

उद्यमबाग येथे ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकण्याचा प्रकार

Amit Kulkarni