Tarun Bharat

शहरातील शाळा आजपासून सुरु

112 शाळांमध्ये 42 हजार विद्यार्थी संख्या
शाळांची तयारी पुर्ण, 5 शिक्षकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने 9 वी ते 12 वीच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा आदेश दिला होता. यानुसार ग्रामीण भागातील 1054 पैकी 400 शाळा सुरु झाल्या होत्या मात्र शहरातील एकही शाळा सुरु झाली नव्हती. शहरातील सुमारे 112 शाळा आजपासून सुरु होत आहेत. 1605 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी 1592 जणांची कोरोना चाचणी पुर्ण झाली आहे. शाळा सुरु करण्याची सर्व तयारी पुर्ण झाली आहे.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने 9 ते 12 वीच्या शाळा सोमवार पासून सुरु करण्याचा आदेश दिला होता. मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे शाळा सुरु होतील की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. राज्यातील इतर जिल्ह्यांनी शाळा सुरु करण्याची तारीख 15 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली होती. मात्र जिल्ह्यातील शाळा टप्प्प्याटप्याने सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी शाळा सुरु होणार की नाही याकडे पालक, विद्यार्थी व प्रशासनाचे लक्ष लागून राहिले होते. तब्बल आठ महिन्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातीला शाळा सुरु झाल्या.

आजअखेर ग्रामीण भागातील 1054 पैकी सुमारे 400 शाळा सुरु झाल्या आहेत. अद्यापही शहरातील एकही शाळा सुरु झाली नव्हती. शहरातील शाळा सुरु करण्याची सर्व तयारी पुर्ण झाली असून आजपासून या शाळा सुरु होत आहेत. शाळा व्यवस्थापनाकडे पालकांनी हमीपत्र दिले असून कोरोनाची सर्व खबरदारी घेवून शाळा सुरु करण्यात येत आहेत. शाळांचे निर्जतुकीकरण करण्याचे काम पुर्ण झाले असून पहिल्या दिवशी 4 तास घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर एका बेंचवर एकाच विद्यार्थ्यास बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. 9 वी ते 12 वीसाठी 1195 शिक्षक असून त्यापैकी 1190 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर 410 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी 402 जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी 5 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरातील शाळा व विद्यार्थी संख्या
शहरातील शाळा ः 112
9 ते 10 विद्यार्थी ः 26 हजार 743
11 ते 12 विद्यार्थी ः 15 हजार 422
42 हजार 165

Related Stories

गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 246

Archana Banage

…तर गोकुळची निवडणूक कशाला ?

Archana Banage

Photo: भारत जोडो यात्रेत कोल्हापुरी फेट्यांचा रुबाब

Archana Banage

इचलकरंजी पाणी योजनेला विरोध वाढला

Archana Banage

तलवार हल्ला प्रकरणी माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे यांना अटक

Archana Banage

अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी एकास कारावास

Archana Banage