Tarun Bharat

शहरातील 25 मंदिरांना शिवप्रतिमेचे वितरण

Advertisements

बेळगाव

 कंग्राळ गल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश हलगेकर यांनी शहरातील 25 मंदिरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे वितरण केले. शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचावेत, या उद्देशाने प्रतिमांचे वितरण केल्याचे आकाश हलगेकर यांनी सांगितले. शिवाजी महाराजांनी मंदिरे वाचविण्यात मोलाचे योगदान दिले. त्याची जाणीव आजच्या पिढीला असायला हवी, त्यासाठी प्रत्येक मंदिरात महाराजांचा फोटो हवा, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत सागर चौगुले, अक्षय कोलकार, चन्नबसाप्पा टोपी, सौरभ सौनन उपस्थित होते. प्रारंभी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते फोटोचे अनावरण करण्यात आले.

मंदिरात महाराजांचा फोटो हवा, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत सागर चौगुले, अक्षय कोलकार, चन्नबसाप्पा टोपी, सौरभ सौनन उपस्थित होते. प्रारंभी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते फोटोचे अनावरण करण्यात आले.

Related Stories

खानापुरात विकेंड लॉकडाऊन यशस्वी

Amit Kulkarni

सोमवारीही पावसाने झोडपले

Amit Kulkarni

सोमवती अमावास्या

Patil_p

चिंचली येथील दोन अधिकारी एसीबीच्या जाळय़ात

Rohan_P

कर्नाटकातील दहा जिल्ह्यांमध्ये कायम स्वरूपी आपत्ती केंद्रे स्थापन केली जाणार

Abhijeet Shinde

पोतदार, एमक्हीएम, ज्ञान प्रबोधन संघ विजयी

Patil_p
error: Content is protected !!