Tarun Bharat

शहरात धुमाकूळ घालणारी चौकडी कोण?

चोऱया-घरफोडय़ा करणाऱया चौघा जणांची छबी सीसीटीव्हीत कैद

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चौघा जणांची छबी कैद झाल्याचे दिसून येत आहे. बेळगावात धुमाकूळ घालणारी ही चौकडी कोण? याचा शोध घेण्यात येत आहे.

गेल्या महिनाभरात चोऱया, घरफोडय़ा नित्याच्याच झाल्या आहेत. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच परप्रांतीय गुन्हेगारही शहरात कार्यरत आहेत. घटनास्थळावरून उपलब्ध झालेल्या ठशांच्या नमुन्यावरून पोलिसांनी अनेक गुन्हेगारी टोळय़ांवर संशय व्यक्त करून त्यांचा पाठलाग सुरू केला आहे.

टिळकवाडी, राजारामनगर परिसरात झालेल्या चोरीप्रकरणातील गुन्हेगारांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यांना पकडण्यासाठी नागरिकांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. सोशल मीडियावर यासंबंधीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. निवांतपणे एखाद्या गेटवरून उडी मारून गुन्हेगार घरात कसे प्रवेश करतात, कडीकोयंडा कसा तोडतात? यासंबंधीची माहिती फुटेजमध्ये आहे.

बहुतेक ठिकाणी आढळून आलेल्या फुटेजमध्ये चोरटय़ांची संख्या 4 ते 5 इतकी आहे. त्यामुळे बेळगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱया त्या चौघा जणांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांना चकवत चोऱया करणाऱया या चौकडीला ताब्यात घेतल्यानंतर अनेक गुन्हय़ांचा उलगडा होणार आहे.

Related Stories

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर : मणिपाल हॉस्पिटल

Abhijeet Shinde

निवृत्त कर्मचाऱयाच्या खात्यातून 10 लाख रुपये हडप

Patil_p

शिवाजी हायस्कूलतर्फे श्रवण पाटीलचा सत्कार

Patil_p

खानापूर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

Patil_p

गोवामुक्ती संग्रामात बेळगाव अग्रस्थानी

Patil_p

मनपा कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना कोरोनाची धास्ती

Patil_p
error: Content is protected !!