Tarun Bharat

शहरात पाणीटंचाईची शक्यता

Advertisements

पाणीसमस्या निवारणासाठी औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठा कपातीचा विचार

प्रतिनिधी /बेळगाव

शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयातील पाणीसाठा संपत आला आहे. पावसाने दडी मारल्याने शहरात पाणीसमस्या निर्माण होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे डेड स्टोअरेजमधील पाणीउपसा करावा लागण्याची शक्मयता असल्याने एल ऍण्ड टी कंपनीची चिंता वाढली आहे. शहरवासियांना पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचाही विचार असल्याची माहिती एल ऍण्ड टीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी दिली.

शहरवासियांना 3 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र राकसकोप जलाशयातील पाणीपातळी कमी झाल्याने पाणीपुरवठय़ात कपात केली आहे. सध्या 5 ते 7 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तरीदेखील 10 ते 12 दिवस पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. आणखी 8 दिवस पाणीपुरवठा करता येणे शक्मय आहे. हा पाणीसाठा संपल्यानंतर डेड स्टोअरेजमधील पाणीउपसा करावा लागणार आहे. मात्र डेड स्टोअरेजमधील पाणीसाठा जास्त दिवस पुरणार नाही. त्यामुळे जोरदार पावसाची गरज आहे. जर पाऊस लांबल्यास पाणीपुरवठय़ासाठी उपाययोजना राबविण्याच्यादृष्टीने एल ऍण्ड टीने पावले उचलली आहेत.

महापालिका आयुक्त रुदेश घाळी आणि एल ऍण्ड टी तसेच पायाभूत सुविधा मंडळाच्या अधिकाऱयांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी पाणीपुरवठय़ासंदर्भात चर्चा करून पाणीटंचाई समस्या निर्माण झाल्यास कोणत्या उपाययोजना हाती घ्याव्यात, याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सध्या शहरवासियांना वापरण्यासाठी विहिरी आणि कूपनलिकांचा पाणीपुरवठा केला जातो. ज्या ठिकाणी पाणीसमस्या निर्माण होईल त्या भागात विहिरीतील पाणी टँकरने पुरवठा करण्याच्यादृष्टीने 10 टँकरची व्यवस्था केली आहे. हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा शहरात करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

पाणीसमस्या निवारणासाठी जोरदार पावसाची गरज आहे. सध्या महाराष्ट्र व विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. तरीदेखील राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होईपर्यंत पाणी जपून वापरणे आवश्यक आहे.

Related Stories

‘त्या’ समाजकंटकांवर तातडीने कारवाई करा

Amit Kulkarni

बॉक्साईट रोड येथे गॅस गळतीमुळे आग

Amit Kulkarni

बाऊन्स वाहनाच्या परवानगीचा तिढा कायम

Patil_p

निवडणुकीची घोषणा, अधिकारी जिल्हय़ातच

Amit Kulkarni

ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना फटका

Amit Kulkarni

जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!