Tarun Bharat

शहरात मोकाट फिरणारे झाले घरबंद…

प्रतिनिधी/ सातारा

ग्रेड सेपरेटरमुळे पोवईनाक्याला वेगळी ओळख मिळाली आहे. आसपासचे सर्व अतिक्रमण निघाली असल्यामुळे हा परिसर अवाढव्य वाटू लागलाय. येथेच असणारे आंब्याचे एक डौलदार झाडही नुकतेच प्रसिद्धीस आले आहे. याच झाडाखाली शुक्रवारी कोरोना टेस्टिंग सेंटर सुरू झालयं. पहिल्याच दिवशी विनाकारण फिरणाऱयांची धरपकड करण्यात आली. त्यात दुचाकीवर आलेल्या दाम्पत्याला अडवल्यानंतर त्यांनी टेस्टिंगला आढेवेडे घेतले. अखेर त्या महिलेने तयारी दर्शवल्यानंतर तिचा अहवाल बाधित आला. पण तिच्यासोबत असणाऱयाने मात्र आपण कालच टेस्टिंट केली असे सांगत वेळ मारुन नेत दुचाकीला किक मारली अन् सुसाट सुटला…. पण काही अंतरावरच जाऊन तो पुन्हा माघारी आला अन् पोलिसांना टेस्ट करण्याबाबत विनंती केली. यावेळी त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला. मोकाट फिरणाऱयांना आता घरात बसावेच लागणार आहे.

  सातारा जिल्हय़ात कोरोना बाधितांचे आकडे रोज रोज नवनवे उच्चांक करत असताना सातारा शहर व परिसरातील आकडे पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ सातारकरांवर आली आहे. लॉकडाऊन जरी असला तरी या ना त्या कारणाने बाहेर फिरणाऱयांची संख्या काही कमी होत नसल्यानेच पोलीस व पालिकेच्या वतीने मनमाड पॅटर्न शहरात राबवण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण फिरणाऱयांची ऍन्टिजन टेस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे का होईना गर्दीवर नियंत्रण करता येईल हा उद्देश डोळय़ासमोर ठेवण्यात आला आहे.

नव्या स्ट्रेनचा प्रसार जोरात होत आहे. एक बाधित व्यक्ती किमान दहा जणांना तरी बाधित करत असल्याचे समोर येत आहे. शहरात असे असंख्य लोक फिरत आहेत. अनेकांना कोरोनाची लक्षणेही आहेत. परंतु तरीही आपल्याला काहीच झालं नाही अशा अर्विभावात ती मोकाट फिरत आहेत. असे नागरिक शहरात कोरोना वाढवत आहेत. त्यामुळेच यावेळी दररोज शहर व सातारा तालुक्यात 500 च्या घरात बाधित येत आहेत.

सातारा शहरात जिल्हा रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर त्याचबरोबर अनेक मोठ मोठी हॉस्पिटल्स आहेत. तसेच तीन लसीकरण केंद्र आहेत. त्यामुळे शहरात हजारो नागरिक सातारा शहरात येत आहेत. याच मोठय़ा संख्येने येणाऱया नागरिकांमुळे शहरात कोरोना वाढू लागला आहे.

 शुसकाळी 11 दरम्यान पोवईनाक्यावर फिरणाऱयांची टेस्ट करण्यास सुरूवात करण्यात आली. पहिल्याच फेरीत जवळपास 30 वयोगटातील एक युवक आणि युवती भरधाव वेगात या मार्गावरून जात होते. त्यांना पोवई नाक्यावर पोलिसांनी अडवुन रॅपिड टेस्ट करण्यास सांगितले. प्रारंभी त्यांनी टेस्ट करण्यास नकार दिला. पण पोलिसांनी चांगलीच तंबी दिल्यावर युवती मात्र तयार झाली. त्यानुसार कस्तुरबा रूग्णालयाच्या कर्मचाऱयांतर्फे त्यांचे नमुने रॅपिड टेस्टसाठी नमुने घेण्यात आले. यामध्ये युवती कोरोना पॉझिटीव्ह निघाली. तिच्या पतीला चांगलाच घाम फुटला त्याने मात्र तपासणी करण्यास नकार दिला. कारण कालच मी तपासणी केली असल्याचे सांगुन त्याने तेथुन पळ काढला. पण काही अंतर पुढे गेल्याने पुन्हा तो माघारी फिरला आणि आपली ही रॅपिड टेस्ट करा अशी विनंती त्याने केली. त्यानुसार त्याची तपासणी केली असता तो ही निगेटीव्ह निघाला. पत्नीला कोणाच्याही संपर्कात न येता, वैद्यकीय सल्ल्यानुसार होम कॉरंटाईन होण्याचा सल्ला दिला.

 शहरातील पोवई नाका, विसावा नाका आदी भागात या तपासण्या करण्यात येत होत्या. पोवई नाका येथे दुपारपर्यंत साधारण 50 नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये तिघांचा अहवाल बाधित आला आहे.

Related Stories

दहा जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

datta jadhav

पर्यटनासाठी आले, अन् मार खाऊन गेले

Archana Banage

आपल्या गुरुजीला शिक्षकांचा विरोध

Kalyani Amanagi

राज्याचे गृहराज्यमंत्री पोहचले थेट घराघरात…!

Archana Banage

सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खुली घेण्यासाठी परवानगी

Archana Banage

आता गावात ‘हायमास्ट’चा पडणार नाही ‘उजेड’

Archana Banage