लोकसंख्या वाढावी म्हणून उपक्रम
भारतासारख्या विकसनशील देशांसाठी लोकसंख्या एक मोठी समस्या आहे. वाढत्या लोकसंख्येला नियंत्रित करण्यासाठी सरकार देखील नवा कायदा आणणार आहे. तर काही देशांमध्ये स्थिती याच्या उलट आहे. काही देशांमधील सरकार लोकसंख्या वाढविण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने देत आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या क्विल्पी शहरातून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील या शहराची लोकसंख्या अत्यंत कमी असल्याचे सांगण्यात येते. आकडेवारीनुसार येथील लोकसंख्या केवळ 800 आहे. अशा स्थितीत स्थानिक प्रशासनाने लोकसंख्या वाढविण्यासाठी नवी युक्ती लढविली आहे.


स्थानिक प्रशासन येथे लोकांना वसविण्याचा प्रयत्न करत आहे. या शहराची लोकसंख्या वाढविणे आणि तेथे घर बांधण्यासाठी प्रशासन मोफत जमीन देणार आहे. याचबरोबर तेथे अनेक कामगारांची गरज आहे. अशा स्थितीत प्रशासन तेथे भत्ता देणार आहे, पण याकरता ऑस्ट्रेलियाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
मोफत जमिनीच्या घोषणेनंतर कमी कालावधीत पूर्ण ऑस्ट्रेलिया आणि विदेशातून सुमारे 250 हून अधिक लोकांनी संपर्क साधला आहे. मोफत जमीन मिळण्याविषयी ब्रिटन, भारत, हाँगकाँग आणि न्यूझीलंडमधील लोकांनी देखील विचारणा केली आहे. पण याकरता संबंधित व्यक्ती ऑस्ट्रेलियाचा नागरिक असणे आवश्यक आहे.