Tarun Bharat

शहरात शाहुपुरी, खेड, सदरबाजार हॉटस्पॉट

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात सुरुवातीपासून कोरोनाचा रोग आला तेव्हापासून ते आतापर्यंत हॉटस्पॉट म्हणून सदरबाजार हाच भाग ठरला आहे. तो अजूनही कायम आहे. काल रात्रीच्या अहवालात तर तब्बल 11 जण सदरबाजार परिसरातील आढळून आले आहेत. शहरात सध्या 43 कंटेटमेंट झोन आहेत. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 239 जण हे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाची घट मिठीच सातारा शहराला बसलेली आहे. शहरात दररोज नवनवीन बाधित येणाऱयांची संख्या दिसून येत आहे.

सातारा शहरात काल रात्रीच्या आलेल्या अहवालातील आकडेवारी वाढत चालली आहे. आकडा पाहून अनेकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे. शहरातील लोकसंख्या 1 लाख 71 हजार एवढी आहे. आजुबाजूचा परिसरही त्यामध्ये येतो. शाहुपुरी, खेड आणि शाहुनगर ही उपनगरे येतात.

सातारा शहरातील कोमॉर्बिड लोक 6 हजार 946 तर 60 वर्षावरील लोकसंख्या 18 हजार635 एवढी आहे. शहरातील आतापर्यंत स्वाब तपासणी 47 हजार 337 तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सीएस साईड टेस्टींग 673 जणांच्या करण्यात आल्या. त्यापैकी 46 हजार432 अहवाल मिळाले. त्यामध्ये निगेटीव्ह 41 हजार379 आले तर पॉझिटीव्ह 5हजार214 संख्या आहे. तर पॉझिटीव्ह रेट 11.01 टक्के एवढा झाला. प्रगतीपर पॉझिटीव्ह 5 हजार 214 असे आतापर्यत आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे 121 जण मृत झाले असून मृताचे प्रमाण 2.3 टक्के एवढे आहे. 4 हजार 746 एवढे बरे होवून घरी गेल्याने रिकव्हरी रेट       91.02 टक्के एवढा आहे. होमआयसोलेशनमध्ये 239 एवढे आहेत. तर 108 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हॉटस्पॉट ठिकाणे

शहरातील हॉटस्पॉट ठिकाणामध्ये खेडमध्ये अजून 17 जण बाधित आहेत.  शाहुपूरीत 24 जण, शाहुनगरात 12जण, संभाजीनगरात 16जण, गोडोली 30जण, सदरबाजारात 47जण, सैनिक स्क्नालमध्ये 13जण, मंगळवार पेठ 32जण रुग्ण असल्याने ही ठिकाणे हॉटस्पॉट ठरली आहेत. तसेच शहरात 800 ठिकाणी कंटेटमेंट झोन होते. ऍक्टीव्ह कंटेटमेट झोन 43 आहेत.

Related Stories

कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांची सेवा सुरु ठेवा

datta jadhav

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा- धनंजय मुंडे

Archana Banage

वारणा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; पडझडीने नुकसान

Archana Banage

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे चौथ्यांदा उघडले

Archana Banage

सांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

Archana Banage

सातारा जिल्ह्यातील तिसरा रुग्ण कोरोना मुक्त; पुष्पगुच्छ आणि टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप

Archana Banage