Tarun Bharat

शहरात 25 मेगावॅटने विजेची मागणी वाढली

B

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर बेळगावमधील औद्योगिक वसाहती 41 दिवसांनी पुन्हा सुरू करण्यात आल्या. उद्योगांची चाके फिरू लागताच विजेचा वापरही हळुहळू वाढत गेला. लॉकडाऊनच्या काळात 55 ते 60 मेगावॅट असणारी विजेची मागणी आता 75 ते 80 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. औद्योगिक वसाहती सुरळीत पद्धतीने सुरू होताच 25 मेगावॅट विजेची मागणी वाढली आहे.

एकीकडे शहरात वाढलेला उष्मा व दुसरीकडे सुरू झालेले उद्योग यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. फ्रीज, कूलर, एसी, फॅन यांचा वापर वाढल्याने घरगुती विजेचीही मागणी वाढली आहे. औद्योगिक वसाहती पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास शहरात 100 ते 110 मेगावॅट विजेची गरज असते. ती सध्या 75 ते 80 मेगावॅट पर्यंत पोहोचली आहे. अजूनही मॉल, मोठी शोरूम्स बंद असल्यामुळे विजेची मागणी पूर्ण क्षमतेने नसल्याचे दिसून येत आहे.

उद्यमबागमध्ये 14 मेगावॅट विजेची मागणी

बेळगावची औद्योगिक वसाहत असणाऱया उद्यमबाग परिसरात अनेक लहान, मोठे उद्योग आहेत. या उद्योगांना मोठय़ा प्रमाणात विजेची गरज भासते. उद्योग सुरू नसताना 1 ते 2 मेगावॅट असणारी विजेची मागणी आता 14 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत विजेची मागणी मोठय़ा प्रमाणात असते. उद्यमबागबरोबरच मच्छे, नावगे, अनगोळ, मजगाव परिसरातही विजेची मागणी वाढली आहे.

  घरगुती विजेचा वापरही वाढला

-एम. टी. अप्पण्णावर (कार्यकारी अभियंते, हेस्कॉम शहर)

औद्योगिक वसाहती सुरू झाल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. सध्या शहराला 75 ते 80 मेगावॅट वीज लागत आहे. उद्योग, शॉपिंग मॉल, शोरूम पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास अजून मागणी वाढणार आहे. घरगुती विजेचा वापरही वाढल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

बेळगाव विमानतळाच्या रनवेची दुरुस्ती

Amit Kulkarni

पाठय़पुस्तकांच्या अभावाने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना

Amit Kulkarni

कोरोना योद्धांचा सन्मान

Amit Kulkarni

पथदीप नसल्याने उद्यमबाग अंधारात

Amit Kulkarni

अनधिकृत वसाहतींवर बुडाकडून कारवाई

Amit Kulkarni

चाकु हल्ला प्रकरणी युवकाला अटक

Patil_p