Tarun Bharat

शहराला लवकरच जादा पाणीपुरवठा

Advertisements

हिडकल योजनेच्या पंपांची क्षमता वाढविण्याचे काम पूर्ण

प्रतिनिधी/ बेळगाव

शहराला हिडकल जलाशयामधून दररोज 10 ते 12 एमजीडी पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र आता लवकरच 18 एमजीडी पाणीपुरवठा होणार आहे. हिडकल जलाशय व ठिकठिकाणी असलेल्या पंपहाऊसमधील विद्युतपंपांची क्षमता वाढविण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. याची पाहणी पाणीपुरवठा मंडळाच्या वरि÷ अधिकाऱयांनी केली आहे.

शहरवासियांना राकसकोप जलाशयातील पाणीपुरवठय़ावर अवलंबून रहावे लागत होते. मात्र 2006 पासून हिडकल जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहरवासियांना मुबलक पाणी मिळते. पण वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सध्याचा पाणीपुरवठा अपुरा आहे. याकरिता तसेच आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी हिडकल जलाशयातील पाणी उपसा क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव मार्गी लागला आहे. 2006 मध्ये हिडकल पाणी योजना राबविण्यात आली. मात्र त्यावेळी हिडकल जलाशयामधील केवळ 12 एमजीडी पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा बसविण्यात आली. पण आता 18 एमजीडी पाणीपुरवठा करण्याची तरतूद करून जलवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. तसेच 3 ठिकाणी पंप हाऊस उभारण्यात आले आहेत. सध्या विविध उपनगरांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तसेच 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या दृष्टीने हिडकल जलाशयातील पाणी उपसा क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव मंजुर करून काम सुरू करण्यात आले होते. सदर काम पूर्णत्वास आले आहे.

हिडकल जलाशयासह तीन ठिकाणाच्या विद्युतपंपांची क्षमता वाढविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी नव्याने पंप बसविण्यात आले आहेत. वास्तविक पाहता सदर काम मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पाणीपुरवठा मंडळाने ठेवले होते. मात्र कोरोनामुळे समस्या निर्माण झाली. परिणामी हे काम पूर्ण होण्यास विलंब झाला आहे. अनलॉकनंतर उर्वरित काम पूर्ण करण्यात आले असून, याची पाहणी पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी नुकतीच केली आहे.

सध्या सर्व ठिकाणाचे पंप बदलण्यात आले आहेत. केवळ राखीव पंपांची जोडणी करणे शिल्लक आहे. त्यामुळे हे काम येत्या आठवडाभरात पूर्ण करून दहा नोव्हेंबर पर्यंत जादा पाणी उपसा करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आहे. जादा पाणी उपसा करण्याची यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर शहराला हिडकल जलाशयामधून दररोज 18 एमजीडी पाणी मिळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होणाऱया उपनगरांना सुरळीत पाणीपुरवठा होण्याची शक्मयता आहे.  

3 ते 5 नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद

हिडकल जलाशय, तुमरगुद्दी आणि कुंदरगी आदी ठिकाणच्या पंप हाऊसमधील पंपांच्या जोडणीचे काम दि. 3 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी दि. 3 ते 5 नोव्हेंबरपर्यंत शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरणाचे काम करण्यात येत असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाने केले आहे.

Related Stories

तरुणाचा गळा चिरुन खून

Patil_p

जमशेदपूरहून ऑक्सिजन रेल्वे बेंगळुरात दाखल

Patil_p

समादेवी गल्ली येथील रहिवाशाची आत्महत्या

Patil_p

बसपास वितरणाला प्रारंभ; लाभ घेण्याचे आवाहन

Amit Kulkarni

‘त्या’बुडालेल्या दोन सख्ख्या बहिणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

आयटीआयसाठी ऑनलाईन परीक्षा नको

Amit Kulkarni
error: Content is protected !!