Tarun Bharat

शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या चार दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. उन्हाचा तडाखाही वाढला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनासाठी लॉकडाऊन केल्यामुळे पोलिसांना भर उन्हातच रस्त्यावर थांबावे लागत होते. ऊन आणि उष्मा यामुळे पोलीस हैराण झाले होते. दुपारी पाऊस आल्यामुळे थोडासा गारवा निर्माण झाला. त्यामुळे काहीसा दिलासा पोलिसांना मिळाला. बाजारपेठमध्ये शुकशुकाट पसरल्यामुळे कोणालाच या पावसाचा व्यत्यय आला नाही. सध्या शेतकरी शिवारातील कामे करण्यात व्यग्र आहे. कडधान्य काढणी पूर्ण झाली आहे. काही शेतकऱयांचा जोंधळा शिवारामध्ये आहे. मात्र, काही शेतकऱयांना कामकाजासाठी पावसाची गरज होती. त्यामुळे हा पाऊस शेतकऱयांसाठी फायद्याचा ठरला.

येळ्ळूर, सुळगे (ये.), वडगाव, शहापूर, मजगाव, अनगोळ, मच्छे, पिरनवाडी, देसूर या परिसरात पाऊस बऱयापैकी झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांना आता कामकाज करणे सोपे जाणार आहे. मात्र, अजूनही दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे.

Related Stories

कोरोनाच्या सावटाखाली प्रथमच घरात नमाज

Patil_p

नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा यात्रोत्सव उत्साहात

Patil_p

बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील कचरा उचल करा

Amit Kulkarni

रस्त्यावरच दुकाने थाटल्याने नंदगड बाजारपेठेत गर्दी

Amit Kulkarni

तोंडचा घास अज्ञातांनी हिरावला

Amit Kulkarni

रेल्वे उड्डाणपूलावर अंधार

Patil_p
error: Content is protected !!