Tarun Bharat

शहरियार नफीस, अब्दुर रझाक क्रिकेटमधून निवृत्त

वृत्त संस्था/ ढाक्का

बांगलादेशचे क्रिकेटपटू शहरीयार नफीस आणि अब्दुर रझाक यांनी क्रिकेटमधून  निवृत्ती जाहीर केली. बांगलादेशचे हे दोन क्रिकेटपटू आता बांगलादेश क्रिकेट मंडळामध्ये विविध पदे सांभाळणार आहेत.

शहरियार नफीस हा बांगलादेशचा फलंदाज तसेच अब्दुर रझाक हा डावखुरा फिरकी गोलंदाज होता. बांगलादेश क्रिकेट मंडळाने या दोन क्रिकेटपटूवर विविध जबाबदारी सोपविली आहे. 38 वर्षीय अब्दुर रझाक याची बांगलादेश क्रिकेट मंडळाने वरिष्ठ निवड समिती सदस्यपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे 32 वर्षीय शहरीयार नफीस याची मंडळाच्या क्रिकेट स्पर्धा आयोजन विभागात नियुक्ती केली आहे. शनिवारी येथील शेर बांगला नॅशनल स्टेडियमवर या दोन्ही क्रिकेटपटूचा बांगलादेश क्रिकेट मंडळातर्फे गौरव करण्यात आला.

अब्दुर रझाकने बांगलादेश संघाकडून खेळताना वनडे क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा गाठला असून अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज आहे. रझाकने वनडे क्रिकेटमध्ये 21 चेंडूत जलद अर्धशतक नोंदविले आहे. वनडे क्रिकेटमध्ये एका डावात पाचपेक्षा अधिक बळी मिळविणारा तो दुसऱया क्रमांकाचा गोलंदाज आहे. रझाकने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 137 सामन्यात 634 बळी मिळविले आहेत. रझाकने पहिल्यांदा क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर 2018 साली पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वयाच्या 35 व्या वर्षी पुनरागमन केले. लंकेविरूद्धची शेवटची कसोटी रझाकची ठरली.

बांगलादेशचा 35 वर्षीय फलंदाज शहरीयार नफीसने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात ब्रेट ली, स्टुअर्ट क्लार्क, जेसन गिलेस्पी, शेन वॉर्न आणि मॅकगिल यांच्या भेदक माऱयाला तोंड देत 138 धावांची खेळी केली होती. बांगलादेशच्या संघामध्ये नफीसला आपले स्थान राखता आले नाही त्यामुळे त्याने या क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला.

Related Stories

व्हेरेव्हला 40 हजार डॉलर्सचा दंड

Patil_p

नॅशनल क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी व्हीव्हीएस लक्ष्मण- गांगुली

Patil_p

बांगलादेशची ओमानवर मात

Patil_p

भारतीय पुरूष हॉकी संघाच्या विश्लेषण प्रशिक्षकपदी ग्रेग क्लार्क

Patil_p

महिला आयपीएल लीगचीही घोषणा

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सचा स्टोईनिस म्हणतो,

Patil_p