Tarun Bharat

शहर-तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

अधिवेशनापूर्वी बेळगाव शहर व तालुक्यात हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रविवार दि. 14 रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ग्राहकांनी हेस्कॉमला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत महांतेशनगर, शिवतीर्थ कॉलनी, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, वृंदावन कॉलनी, अंजनेयनगर, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, केएमएफ, शिवाजीनगर, शिवबसवनगर, अशोकनगर, वीरभद्रनगर, पोलीस क्वॉर्टर्स, श्रीनगर, चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, काकतीवेस, क्लब रोड व जिल्हाधिकारी कार्यालय परिसर.

सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत येडियुराप्पा मार्ग, बसवाण गल्ली व बाजार गल्ली या परिसरात वीजपुरवठा ठप्प असणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 यावेळेत कोंडुसकोप, हलगा, बस्तवाड, शगनमट्टी, खमकारट्टी, कोळीकोप्प, बडेकोळ्ळमठ, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, भरतेश कॉलेज निलजी क्रॉस, शिंदोळी क्रॉस या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली आहे.

Related Stories

सीमालढय़ावरील पुस्तकाचे 27 रोजी मुंबईत प्रकाशन

Patil_p

जिल्हय़ात शनिवारी रुग्णसंख्या चार शतकाचा आकडा पार

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात बुधवारी 281 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

हलकर्णीत जुगार अड्डय़ावर छापा

Patil_p

उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील रस्ते दुरवस्थेत

Omkar B

उडुपीचा नित्यानंद कोटियन ‘मि. कर्नाटक’ किताबाचा मानकरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!