Tarun Bharat

शहर परिसर अडकला बॅरिकेड्सच्या विळख्यात

बेळगाव/ प्रतिनिधी

बेळगाव भागातील तीन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह ठरल्याच्या घटनेनंतर शहर आणि परिसरात पोलिसी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे शहराचा संपूर्ण परिसर बॅरिकेड्सच्या विळख्यात अडकला आहे. 

शुक्रवारी सायंकाळी तीन संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर शहर आणि परिसरात ही परिस्थिती उद्भवली असून त्यामुळे नागरिकांवर संचार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून शहर परिसर बॅरिकेड्समध्ये अडकला आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकारी देत असून  दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. शहरातील खडेबाजार, गणपत गल्ली, मार्केट , मध्यवर्ती बसस्थानक परिसर, जिजामाता चौक, किर्लोस्कर रोड आणि इतर सर्व गल्ल्यांच्या परिसरात संचारबंदी सदृश्य वातावरण दिसून येत आहे.

Related Stories

नुकसान भरपाई द्यायची नाही तर घोषणा कशासाठी?

Patil_p

अंगणवाडय़ांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट

Amit Kulkarni

मराठा मंडळ दंत वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी केंद्र सुरू

Amit Kulkarni

गोल्ड्स जीममध्ये शिवजयंती साजरी

Patil_p

बॉडिफिट गराज – निरोगी व सुदृढ शरिरसंपदेचे दालन

Patil_p

कुसमळी ग्रामस्थांकडून चोर्ला रस्त्याची दुरुस्ती

Amit Kulkarni