Tarun Bharat

शहर पोलिसांकडून तडीपार गुंडास अटक

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील विकास मुरलीधर मुळे (वय 20) गुन्हेगारास 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही हा गुन्हेगार सोमवारी शहरात फिरताना आढळून आल्याने त्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तुरूगांत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मंगळवार पेठ येथील पॉवर हाऊस झोपडपट्टीत राहत असलेला आरोपी विकास मुरलीधर मुळे (वय 20) हा सराईत गुंड असून त्यांच्यावर चोरीचे 9 गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याला 2 ऑगस्ट रोजी दोन वर्षासाठी सातारा जिह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तडीपार केले होते. तरीही तो सोमवारी शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळत्याच त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तुरूगांत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

खबरदार शहरात पाऊल ठेवाल

तडीपार करण्यात आलेल्या गुंड पुन्हा शहरात फिरताना आढळत आहेत. यामुळे अशा गुंडाची माहिती मिळताच तात्काळ त्यांना अटक करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या गुंडाना पुन्हा शहरात पाऊल ठेवाल तर जेलमध्ये टाकण्यात येईल अशी तंबी दिली आहे.  

तडीपार करण्यात आलेल्या गुंडाची नावे

आमीर इम्तीयाज मुजावर (रा. पिरवाडी), आमिर सलीम शेख (वनवासवाडी), प्रल्हाद रमेश पवार(रा. केसरकर पेठ), जीवन शहाजी रावते(रा. कोडोली), अभिजीत अशोक भिसे(रा. कोडोली), जगदीश रामेश्वर मते(रा. शाहूपुरी), सौरभ संजय जाधव(रा. मोळाचा ओढा), अभिजीत राजू भिसे(रा. मोळाचा ओढा), आकाश हणमंत पवार(रा. सैदापूर) यांना तडीपार करण्यात आले आहे. हे गुंड सातारा शहरात फिरताना आढळून आल्यास शहर पोलीस ठाण्यात 02162-230580 यावर माहिती देण्याचे आवाहन पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.  

Related Stories

पाणी नाही दिलं तर कर्नाटकात जाऊ ; पाणी संघर्ष समितीचा महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम

Archana Banage

छत्रपतींचे सेवक संघटनेकडून किल्ले अजिंक्यताऱ्यावर दुर्गसंवर्धन मोहीम

Archana Banage

ओबीसी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी युतीचं सरकार यावं लागलं, आता मविआ श्रेयाचं ढोल पिटवेल

Abhijeet Khandekar

एनडीआरएफची टीम कोल्हापुरात दाखल होणार

Archana Banage

सातारा : ‘आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या’

Archana Banage

लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात प्रबळ विरोधकांची गरज

Patil_p