Tarun Bharat

शहापूरमधील सराफी दुकाने 25 ऑगस्टपासून बंद

बेळगाव :

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढून रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शहापूर बाजारपेठेत सराफी बाजारपेठ, कपडय़ाची दुकाने व भाजी मार्केट एकत्रच असल्याने गर्दीचे प्रमाण बरेच वाढले आहे. बेळगाव शहरात व उपनगरात कोरोनाबाधित पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहापूरमधील सराफ असोसिएशनने तातडीची बैठक घेऊन सभासदांची मते जाणून घेतली. सराफ असोसिएशनच्या इमारतीत दिलीप तिळवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

सभासदांनी मते मांडताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दुकाने काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते चर्चेत पुढे आला. ग्राहकांच्या सोयीसाठी व मागील घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सोमवार दि. 24 ऑगस्टपर्यंत दुकाने 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर मात्र, 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर अखेर शहापूरमधील सराफी दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शहापूर सराफ कट्टय़ावरील दुकानांसोबतच उपनगरे व आजुबाजूच्या ग्रामीण भागातील सराफी व्यावसायिकांनी त्याचबरोबर सराफी व्यवसाय संबंधित आटणी, टंच, तार पाष्टा आदी व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून सर्व व्यापाऱयांचे हीत जपावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनासंबंधित व उपचाराबाबत विचारविमर्ष करण्यात आले. अनेक सभासदांनी विदारक अनुभव सांगून परिस्थितीचे गांभीर्य विषद केले. सर्व सभासदांनी एकमतांनी घेतलेल्या निर्णयाशी बांधिल राहण्याचे ठरविले. बैठकीत उपाध्यक्ष अभिनंदन लेंगडे, सेक्रेटरी उदय कारेकरसह सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

स्वच्छता कामगारांच्या समस्या सोडवा

Amit Kulkarni

खानापूर-हत्तरगुंजी रस्ता अपूर्ण

Amit Kulkarni

नंदिहळ्ळी येथील रेल्वेमार्गात बदल करा

Amit Kulkarni

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लबचे यश

Amit Kulkarni

संरक्षण राज्यमंत्री प्रशस्तीपत्रकाचा प्रथमेश पाटील मानकरी

Patil_p

आनंदवाडीवासियांना मोठा दिलासा

Amit Kulkarni