Tarun Bharat

शहापूर परिसरात राबविल्या खबरदारीच्या उपाययोजना

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर-उपनगरांत कोरोनासह साथीच्या रोगांचा फैलाव वाढत आहे. शहापूर बॅ. नाथ पै चौकाजवळील चांभारवाडा परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे  महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले असून सोमवारी सकाळी औषध फवारणी तसेच स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात आले.

मागील चार महिन्यांमध्ये शहरातील विविध परिसरात डेंग्यूची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. पण महापालिकेने याबाबत कोणतेच गांभीर्य घेतले नव्हते. डेंग्यूच्या रुग्णात वाढ होत असूनही महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी सुस्तच होते. शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशी मागणी करूनही अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला होता.

कोराना विषाणूची लागण झपाटय़ाने होत असल्याने याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्यात जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासन व्यस्त होते. पण मागील आठवडय़ात वडगाव, विष्णू गल्ली येथील 12 वर्षाच्या मुलाचा डेंग्यूमुळे बळी गेला आहे. शहापूर चांभारवाडा परिसरात डेंग्यूचे 12 रुग्ण असल्याची चर्चा होती. तरीदेखील महापालिकेचे अधिकारी सुस्तच होते. मात्र महापालिकेच्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षाबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून अधिकाऱयांचे लक्ष वेधले असता, आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. शहापूर परिसरात सध्या डासांचा उपद्रव वाढला असल्याने प्रथम फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणी करण्यात आली. सोमवारी सकाळीच मनपाच्या आरोग्य विभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले. परिसरातील स्वच्छतेचे काम हाती घेऊन संपूर्ण परिसरात रोगप्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली. साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये, परिसरात स्वच्छता राखावी, आरोग्याची काळजी घ्यावी, यासह प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षक कलावती यांच्यासह मुकादम श्याम चौगुले, दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपाययोजना राबविण्यात आल्या. 

Related Stories

शेतकऱयांची कमाल, तंत्रज्ञानाची धमाल

Amit Kulkarni

मनपा कार्यालयातील अधिकाऱयांचे बदलीसत्र

Patil_p

बुधवारी जिह्यात कोरोनाचा उद्रेक, उच्चांकी 757 रुग्णांची नोंद

Patil_p

सीमाभाग केंद्रशासित करण्याची गरज

Tousif Mujawar

‘बेड नाही’…चा फटका! हत्तरगी येथील वृद्धाचा मृत्यू

Patil_p

रस्त्यावर चलनी नोटा टाकण्याचे प्रकार सुरूच

Patil_p