Tarun Bharat

शहापूर परिसरात संपूर्ण लॉकडाऊन

प्रतिनिधी / बेळगाव :

बेळगाव शहर व तालुक्मयात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. शहापूर परिसरात रविवारी शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले. केवळ मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने व सेवा बंद करून नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये आपला सहभाग दर्शविला. यामुळे शहापूरच्या रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.

मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असले तरी सकाळच्या सत्रात शहापूर परिसरात खरेदी-विक्री करण्यासाठी मुभा देण्यात येत होती. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, किराणा मालाची दुकाने सकाळी 10 पर्यंत सुरू करण्यात येत होती. परंतु खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असल्यामुळे व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱया नागरिकांची विचारपूस करूनच त्यांना पुढे सोडले जात आहे. नाथ पै चौक, बसवाण गल्ली कॉर्नर, मारुती मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, खासबाग या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरीही काही नागरिक संचार करीत असल्यामुळे त्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला. वारंवार आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱया नागरिकांवर कारवाई केली जात होती.

ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे शहापूर, खासबाग, आनंदवाडी येथे शुकशुकाट पहायला मिळाला. ‘गरिबांचा बाजार’ अशी ओळख असणारा खासबागचा बाजार या रविवारीही लॉकडाऊन असल्यामुळे भरू शकला नाही. एरव्ही गर्दीने फुललेल्या रस्त्यांवर आता मात्र शुकशुकाट पसरला आहे. 

Related Stories

बेळगाव-बेंगळूर आराम बसला आग

Patil_p

निपाणी बीसीपीएसच्या उपनिरीक्षकपदी अनिता राठोड रुजू

Patil_p

गोवावेस ते तिसरे रेल्वेगेट रस्ता महिनाभर राहणार बंद

Amit Kulkarni

रविवारी जिल्हय़ात 319 नवे रुग्ण

Amit Kulkarni

कुत्र्यांचे आज मोफत रेबीज लसीकरण

Amit Kulkarni

सौंदत्ती येथील रेणुका मंदिर 28 पासून भक्तांसाठी खुले

Amit Kulkarni