Tarun Bharat

शहापूर येथील हॉस्पिटलवर समाजकंटकांचा हल्ला

कोरोना रुग्णांना दाखल करून घेतल्याने केला हल्ला, हॉस्पिटलमध्ये घातला धूडगूस : कर्मचाऱयांना मारहाण

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱया खासगी हॉस्पिटलमधील स्टाफवरच समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास शहापूरमध्ये घडली. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णामुळे इतरांना संसर्ग होणार असे म्हणत काही जणांनी हा हल्ला केला.

शहापूर हट्टीहोळी गल्ली येथे डॉ. मिलींद हलगेकर यांचे माई हॉस्पिटल आहे. खासगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णांना दाखल करून घेणे सरकारने बंधनकारक केले आहे. त्यानुसार या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र हा विभाग वेगळा व स्वतंत्र आहे. डॉ. मिलींद हलगेकर हे बालरोग तज्ञ असून त्यांच्या पत्नी उज्ज्वला हलगेकर या फिजीशियन आहेत. त्यामुळे येथे कोरोना रुग्णांसह ओपीडीसुद्धा सुरू आहे.

परंतु हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण दाखल झाल्याने इतरांना संसर्ग होणार आहे. तुम्ही रोग पसरवत आहात, असे म्हणत काही समाजकंटकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन धुडगूस घातला. महिला कर्मचाऱयांवरही हल्ला केला. झालेल्या या प्रकाराने हॉस्पिटलचा स्टाफ भयभीत झाला असून रात्री उशिरा डॉ. मिलींद हलगेकर यांनी एमएलसी केली आहे. दरम्यान सरकारच्या नियमांचे पालन करत असताना असा हल्ला होणे हे अत्यंत दुर्दैवी असून सोमवारपासून आपण हॉस्पिटल बंद ठेवत असल्याचे डॉ. मिलींद हलगेकर यांनी तरुण भारतशी बेलताना सांगितले. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा री आपला जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत असताना असे हल्ले झाल्यास डॉक्टर आपली सेवा बंद करतील. यानंतर उपचाराअभावी रुग्णांची परवड झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्नही डॉ. मिलींद हलगेकर यांनी केला आहे.

प्रशासनाने म्हणजेच जिल्हाधिकाऱयांमार्फत खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड राखीव ठेवा आणि त्यांच्यावर उपचार करा या सूचनेमुळे सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या करून आबाधित यांवर उपचार सुरू आहेत सर्व अडचणींना तोंड देत आम्ही आमचे जीव धोक्मयात घालून उपचार करत आहोत अशावेळी हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर आणि कर्मचाऱयांवर हल्ला होणे ही ही अत्यंत निंदनीय बाब आहे सरकारने दिलेल्या सूचनेनुसार मी गेले कित्येक दिवस कोरोना बाधित आणि वर उपचार करत आहे मात्र झालेला हल्ला आणि या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आमचे कर्मचारी आणि डॉक्टर यांची अवस्था पाहता आम्हाला नाईलाजाने आजपासून हॉस्पिटल बंद करावे लागत आहे उपचाराअभावी रुग्णांचे हाल झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही हा निर्णय आम्हाला नाईलाजास्तव घ्यावा लागत आहे पोलीस यंत्रणा आणि प्रशासन याबाबत योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आहे

-डॉक्टर उज्वला हलगेकर फिजिशियन

Related Stories

नाक्यावर जवान तैनात करा

Omkar B

रासायनिक खतांचा शेतीत वाढता वापर

Amit Kulkarni

केवळ अर्ध्या तासातच पावसाने उडविली दैना

Patil_p

बेळगावसह काही जिल्हय़ात विकेंड कर्फ्यू मागे

Amit Kulkarni

छत्रपती संभाजीराजेंचे धर्मकार्य अतुलनीय

Patil_p

रोहन कुपेकर स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा 31 रोजी

Amit Kulkarni