Tarun Bharat

शहापूर येथे चार कार फोडल्या

Advertisements

मध्यरात्री माथेफिरुच्या प्रतापाने घबराट

प्रतिनिधी/ बेळगाव

शहापूर येथे घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या कारवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री एका मातेफिरुने हा प्रताप केला असून शहापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाले आहे.

कचेरी गल्ली व सराफ गल्ली परिसरात घरासमोर रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून सीसीटीव्हीच्या फुटेजवरून संबंधिताला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शनिवारी सकाळी हे प्रकार उघडकीस आले आहेत. कचेरी गल्ली परिसरात तीन वाहने व सराफ गल्ली परिसरातील एका कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. दगडफेक करून कारच्या काचा फोडणाऱया मातेफिरुचे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. मध्यरात्री 12.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सीसीटीव्हीच्या फुटेजवरून संबंधिताचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. यापूर्वी शहर व उपनगरांत घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या काचा फोडणे, वाहने पेटविण्याचे प्रकार घडले आहेत. त्यावेळी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. बहुतेकवेळा नशेत हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगाराच्या मुसक्मया आवळाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

त्या न्यायाधीशांवर कारवाईची मागणी

Amit Kulkarni

कन्नडती राज्य पुरस्काराने राजेश्वरी हेगडे सन्मानित

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट आयुर्वेदिक उपचार केंद्राला प्रतिसाद

Amit Kulkarni

बेळगावच्या सराफाला मंडय़ा जिल्हय़ात लुटले

Omkar B

मराठा विकास निगमला लवकरच अनुदान

Omkar B

स्वाधार केंद्रातून तरुणी बेपत्ता

Amit Kulkarni
error: Content is protected !!