बेळगाव / प्रतिनिधी
शहापूर विभाग महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने बुधवार दि. 13 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वा. सिद्धिविनायक गणेश मंदिर, रामलिंगवाडी, गोवावेस येथे बैठक होणार असून यावेळी सर्व पदाधिकारी, समितीच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.