Tarun Bharat

शहाबंदरजवळ सव्वालाखाची गावठी दारू जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव

हुक्केरी तालुक्मयातील शहाबंदरजवळ शनिवारी सकाळी मोठय़ा प्रमाणात गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. अबकारी विभागाने ही कारवाई केली असून मोटारसायकली व दारुसाठा तेथेच सोडून विपेत्यांनी तेथून पलायन केले आहे.

चिकोडी विभागाचे अबकारी उपअधीक्षक विजयकुमार हिरेमठ, बसवराज करमण्णावर, निरीक्षक सुनीलकुमार डी., हसनसाब, विजय उप्पार, राजू अंबारी, महाबळ उगार आदींनी शनिवारी पहाटे शहाबंदरजवळ छापा टाकून हा साठा जप्त केला आहे. सहआयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ व उपायुक्त बसवराज संदीगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

दोन मोटारसायकली, 11 रबरी टय़ूबमधून प्रत्येकी 30 लिटरप्रमाणे 330 लिटर इतकी गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. अबकारी अधिकाऱयांनी छापा टाकताच दारुविपेत्यांनी पलायन केले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यासंबंधी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत 1 लाख 26 हजार रुपये इतकी होते.

Related Stories

रेल्वेस्थानक परिसरात पार्किंगला जागा मिळेना

Amit Kulkarni

चिखले येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

Patil_p

कचरावाहू वाहनाच्या बॅटरीची चोरी झाल्याने कचरा उचल ठप्प

Amit Kulkarni

छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी गांभीर्याने

Amit Kulkarni

धारवाडमध्ये शेतकऱयांचा ट्रक्टर मोर्चा

Patil_p

सिद्धेश्वर मंदिर परिसरात पेमीयुगुलांवर होणार कारवाई

Amit Kulkarni