Tarun Bharat

शहीद सुनिल काळे पंचतत्वात विलीन

बार्शी /प्रतिनिधी


जम्मू काश्मीर येथे पुलवामा जिल्ह्यात बंडजु या गावी भारतीय जवान आणि अतिरेकी यांच्या झालेल्या चकमकीत बार्शी तालुक्यातील पानगाव या गावचे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान सुनील काळे हे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव आज सकाळी विशेष गाडीने पानगाव या गावी आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी बार्शी व परिसरातून हजारो लोकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजेरी लावली होती. या आतिशय हृदय पिळवटून टाकणाऱ्या अंतिम संस्काराच्या वेळी शहीद जवान काळे यांचे कुटुंबीय त्यांची आई त्यांची पत्नी यांनी फोडलेला टाहो ऐकून उपस्थीत जणांच्या डोळ्यात अश्रू गहिवरले.

शहीद जवान सुनिल काळे यांचे पार्थिव पानगाव येथे आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरासमोर ठेवले होते. त्यानंतर त्यांची अंतिम यात्रा फुलांनी सजवलेल्या वाहनातून गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. या अंतिम यात्रेचे समयी गावातील लोकांनी आणि विशेष करून महिलांनी जवान काळे यांचे पार्थिव ठेवलेल्या वाहनावरती पुष्पवृष्टी करीत आपल्या गावातील लाडक्या शहीद जवान काळे याना आज अखेरचा निरोप दिला. तर या अंतिम यात्रे समयी गावातील तरुणांनी शहीद जवान सुनील काळे अमर रहे, वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणाही दिल्या गेल्या ही अंतिम यात्रा गावातील स्मशानभूमी पर्यंत आल्यानंतर शहीद जवान सुनिल काळे यांना शेवटची मानवंदना देण्यात आली.

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर बार्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र राऊत, बार्शी नगर परिषदेचे अध्यक्ष असिफ तांबोळी ,विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे संचालक डी एस मिश्रा ,उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, बार्शी चे तहसीलदार प्रदीप शेलार, गटविकास अधिकारी शेखर सावंत, बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण देशपांडे, बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी , शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर यादव आणि त्यांचे सहकारी व इतर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्पचक्र वाहून शहीद जवान काळे यांना मानवंदना दिली

यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाने आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने हवेमध्ये तीन राऊंड फायर करून शहीद जवान सुनील काळे यांना अखेरची मानवंदना दिली तर पोलीस बँड ने नाही आपल्या वतीने शहीद जवान यांना अखेरची मानवंदना दिली.

यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे संचालक डी एस मिश्रा यांनी सांगितले की , शहीद जवान सुनिल काळे सारखा सैनिक यापुढे होणे नाही त्यांनी जवान सुनील काळे यांच्याविषयी सांगताना गहिवरून आले, आणि पुढे सांगितले की तीन जून रोजी झालेल्या एका चकमकीत शहीद जवान सुनिल काळे यांनी अतुलनीय पराक्रम दाखवीत तीन आतंकवाद्यांना यमसदनी पाठवण्यासाठी धाडशी कार्य केले होते त्यामुळे जवान काळे यांचे नाव केंद्रीय पोलीस वीरता पदक साठी सुचविले होते मात्र पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात जवान काळे हे शहीद झाले. पुलवामा येथे झालेल्या चकमकी विषयी त्यांनी सांगितले की बंदजू या गावामध्ये काही अतिरेकी एका घरात लपून बसले आहेत अशी माहिती मिळताच आमची एक तुकडीने त्या घराला घेरले होते. तेव्हा घरांमध्ये लपलेल्या आतंकवाद्यांनी अचानक फायरिंग चालू केल्यामुळे शहीद जवान सुनिल काळे यांनीही प्रत्युत्तरादाखल फायरिंग केले त्यात त्यांनी दोन आतंकवाद्यांना यमसदनी पाठवले आणि आतंकवादी यांचे कडून झालेल्या गोळीबारात मध्ये जवान काळे यांच्या डोक्याला एक गोळी लागली आणि ते शहीद झाले.

पानगाव या गावातील सध्या सत्तर ते ऐंशी युवक संरक्षण दलामध्ये असून शहीद जवान सुनिल काळे पानगाव या गावातील चौथे शहीद आहेत. यापूर्वी या गावाने चार पराक्रमी जवान गमावले आहेत 1962 साली झालेल्या भारत चीन युद्ध मध्ये या गावातील अभिमान भिमराव पवार आणि दिगंबर चव्हाण हे दोघेही शहीद झाले होते तर 2007 साली याच गावातील राजेंद्र मोरे शहीद झाले होते.शहीद जवान सुनिल काळे हे शहीद झाल्याने पानगाव हे पराक्रमी वीरांचे गाव आहे हे सिद्ध होत आहे.

शासन काळे कुटुंबियांच्या पाठीशी
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शहीद जवान सुनिल काळे यांचे वीरमरण महाराष्ट्र शासन वाया जाऊ देणार नाही तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबीर उभी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले

Related Stories

सोलापूर : हन्नुर येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Archana Banage

महाशक्तीकडून राज्यात लोकशाहीची हत्या

datta jadhav

काश्मिरी पंडितांवरिल हल्ला हे मोदी सरकारचे अपयश- खा.असदुद्दीन ओवेसी

Abhijeet Khandekar

ठाकरे सरकारचा मोठ निर्णय : महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण होणार

Archana Banage

उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश नाही

datta jadhav

सोलापूर ग्रामीण भागात आज 135 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage