Tarun Bharat

शहीद 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटींची भरपाई द्या – वरुण गांधी

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

तब्बल अकरा महिने सुरु असलेले दिल्लीस्थित कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनच्या आरंभी टप्प्यापासुन ते आत्ता पर्यंत तब्बल 700 आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा करताना देशाचे पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनात प्राणास मुकावे लागलेल्या आंदोलकांद्दल साधा उच्चार ही केला नाही. मात्र भाजप खासदार वरुण गांधी यांनी मोदींना घरचा आहेर दिला आहे.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजप खासदार वरुण गांधी यांनी एक पत्र पाठवले आहे. या पत्रात वरुण गांधी यांनी कृषी कायदे यापुर्वीच मागे घ्यायला हवे होते. अशी खंत व्यक्त करत शेतकरी आंदोलनात तब्बल 700 शेतकरी शहीद झाले. त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक-एक कोटी रुपये द्यावे अशी मागणी आपल्या पत्रातून केली आहे. तसेच आंदोलनादरम्यान अनेक भुमीपुत्रांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ते गुन्हे ही मागे घ्यावेत, यापुढे शेतकऱ्यांना हमीभाव मीळावा यासाठी कायदा करावा. जेणेकरूनआंदोलक शेतकरी सन्मानाने घरी परततील. असे ही या पत्रात म्हटले आहे.

त्याचबरोबर लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. ही घटना लोकशाहीवर एक काळा डाग आहे. त्या प्रकरणाची सुद्धा निःपक्ष चौकशी व्यायला हवी. यामध्ये सहभागी असलेल्या केंद्रीय मंत्र्यावर सुद्धा कठोर कारवाई करायला हवी. सरकार लवकरच या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा करतो असेही वरुण गांधी यांनी आपल्या पत्रातून लिहिले आहे. त्यामुळे मोदी सरकार याबाबत नेमकी काय भुमिका घेणार आहे. हे पाहणे औत्सुकतेच ठरणार आहे.

Related Stories

ममता एक्सप्रेस सुसाट ; अभिनेत्री श्रबंती चॅटर्जीचा भाजपला रामराम

Abhijeet Khandekar

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2.21 लाखांच्या उंबरठ्यावर

Tousif Mujawar

बेकायदा धारदार शस्त्रांसह साताऱयातील एकास अटक

Patil_p

जीएसटी संकलन, उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ

Patil_p

…तर मोदी सरकार तुम्हाला देईल पाच हजारांचे बक्षीस

datta jadhav

लससाठा उपलब्ध नसल्याने मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद

Tousif Mujawar
error: Content is protected !!