Tarun Bharat

शांघायनजीक अमेरिकेच्या लढाऊ विमानांचे उड्डाण

केवळ 76 किमी अंतरावरून उड्डाण : जिनपिंग प्रशासन दहशतीत : तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकेने उचलली पावले

पाकधार्जिणे रजाक ठरले गुन्हेगार

वृत्तसंस्था/ क्वालांलपूर

मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांना मलेशिया डेव्हलपमेंट बरहाद (1 एमडीबी) स्टेट फंडमधील अब्जावधी डॉलर्सच्या भ्रष्टाचाराप्रकरणी मंगळवारी दोषी ठरविण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या सर्व 7 प्रकरणांमध्ये ते दोषी ठरले आहेत.

नजीब यांच्यावर सत्तेचा गैरवापर, विश्वासभंगाचे तीन  आणि अन्य 3 गुन्हे नेंद होते. नजीब यांना 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजकीय सूडातून हा खटला चालविण्यात आल्याचा दावा नजीब यांनी केला आहे.

पंतप्रधान झाल्यावर नजीब यांनी 1एमडीबी निधीची स्थापना केली होती. मलेशियाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा उद्देश यामागे होता. परंतु निधीत अब्जावधीचे कर्ज जमा होत गेले आणि यातील किमान 4.5 अब्ज डॉलर्सच्या निधीवर डल्ला मारण्यात आल्याचे उघड झाले होते. मनी लॉन्ड्रिंग करत नजीब यांच्या सहकाऱयांनी हॉलिवूडचे चित्रपट आणि हॉटेल्समध्ये गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. याचबरोबर याच रकमेतून महागडे दागिने, कोटय़वधी डॉलर्सची यॉट (आलिशान जहाज) आणि जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोची चित्रेही खरेदी करण्यात आली होती. याचबरोबर निधीतील 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम नजीब यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. नजीब यांची पत्नी, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले हेते.

66 वर्षीय नजीब रजाक हे पाकिस्तानधार्जिणे राहिले होते. त्यांच्या धोरणामुळे मलेशिया आणि भारताच्या संबंधांमध्ये कटूता आली होती. परंतु रजाक यांची सत्ता गेल्यावर पंतप्रधान झालेले महातिर मोहम्मद यांनीही भारतविरोधी भूमिका घेतली होती. पण मोहम्मद यांना हटवून यासीन सत्तासूत्रे घेतल्यापासून दोन्ही देशांचे संबंध पूर्वपदावर येऊ लागले आहेत.

Related Stories

तैवानमध्ये रेल्वे अपघातात 36 ठार, 72 जखमी

datta jadhav

शिकारीच जेव्हा शिकार होतो…

Patil_p

न्यूयॉर्कमध्ये अपार्टमेंटला आग, 19 जण मृत्युमुखी

Amit Kulkarni

योग्य लसीकरण झाल्यास जुलैपर्यंत स्थिती सुरळीत

Patil_p

शहरी लोकांमध्ये ‘प्लांट ब्लाइंडनेस’

Amit Kulkarni

मृतांच्या पसंतीची डिश तयार करणारी महिला

Patil_p